सेलिब्रिटी पती- पत्नीची विभक्त जोडी Bigg Boss मराठीच्या घरात आमने-सामने

कोण होता तिचा पती, का आता नात्यात दुरावा? 

Updated: Sep 20, 2021, 02:08 PM IST
सेलिब्रिटी पती- पत्नीची विभक्त जोडी Bigg Boss मराठीच्या घरात आमने-सामने  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रिअॅलिटी शोंच्या यादीत अतिशय गाजलेल्या कार्यक्रमांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे 'बिग बॉस'. हिंदीमध्ये या कार्यक्रमाला मिळालेली लोकप्रियता पाहता मराठीतही बिग बॉसच्या पर्वाची सुरुवात झाली आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उचलून धरलं. 

मराठी वर्तुळात सेलिब्रिटी म्हणून नावारुपास आलेल्या अनेक व्यक्तींना या घरात प्रवेश दिला जातो. ज्यानंतर 100 दिवसांसाठी सुरुवात होते एका अनपेक्षित प्रवासाची. सध्याही या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं यंदा या घरात सोनाली पाटील, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम यांचा प्रवेश झाला आहे. सोबतच या चेहऱ्यांमध्ये दोन व्यक्ती असेही आहेत, जे एकेकाळी एकमेकांशी विवाहबंधनात अडकले होते. 

घटस्फोट घेत नात्यातून विभक्त होणाऱ्य़ा या दोन व्यक्ती म्हणजे, स्नेहा वाघ आणि अविष्कार दारवेकर. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी स्नेहानं अविष्कारसोबत नव्या नात्याची सुरुवात केली होती. पण, या नात्यात तिला घरगुती हिंसेचा सामना करावा लागला होता. स्नेहानं आपल्यावर होणाऱ्या या अत्याचारांविरोधात भूमिका घेतली आणि हीच ठिणगी त्यांच्या नात्यात वणवा पेटवून सारंकाही नष्ट करुन गेली. 

डोकं आहे का? पाहा घटस्फोटाबाबतचा प्रश्न विचारणाऱ्याला समंथानं फटकारलं

 

स्नेहाच्या खासगी आयुष्य़ात तिनं बऱ्याच अडचणींचा सामना केला. पण, अखेर तिनं कलेच्या साथीनं या साऱ्यातून स्वत:ला बाहेरही काढलं. आता स्नेहा आणि तिचा Ex Husband बिग बॉसच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोरासमोर येत आहेत. त्यामुळं या कार्यक्रमात त्यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडणार की, खिलाडूवृत्तीनं ते दोघंही कार्यक्रमात सहभागी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.