Bigg boss contestant : गेल्या 10 वर्षांपासून प्रसिद्धीच्या उंचीवर असलेल्या बिग बॉस कन्नडच्या दहाव्या सिझनवेळी (bigg boss kannada 10 ) धक्कादायक घटना समोर आली आहे. 'बिग बॉस कन्नड'च्या 10व्या सीझनचा स्पर्धक वरथूर संतोष (Varthur Santhosh Arrested) अडचणीत सापडला आहे. बिग बॉस कन्नड शोच्या मध्येच संतोषवर पोलिसांनी कारवाई केली आहे. संतोषविरुद्ध अजामीनपात्र कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. पोलिसांनी ही कारवाई का केली? याचं उत्तर देखील मिळालं आहे. लाईव्ह कार्यक्रमातून संतोषवर कारवाई झाल्याने बिग बॉसच्या प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
झालं असं की... वरथूर संतोष याने 'बिग बॉस कन्नड'मध्ये वाघाच्या पंजापासून बनवलेले लॉकेट घातलं होतं. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्याच्यावर कारवाई केली. त्याचबरोबर एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. काल 22 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी ही घटना घडली. वन विभागाच्या पोलिसांची टीम बिग बॉस कन्नडच्या सेटवर पोहोचली. त्यानंतर टीमने कारवाईचा बडगा उगारला.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संतोषची साखळी आणण्यास सांगितलं. तपासादरम्यान वरथूर संतोषने घातलेल्या साखळीत वाघाचा पंजा असल्याचं सिद्ध झालं अन् पोलिसांनी संतोषला अटक केली आहे. काही तासानंतर संतोष बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्यामुळे बिग बॉसच्या घरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे.
आणखी वाचा - क्रिकेटपटू जडेजाची नवी इनिंग; सलमानच्या Big Boss शोमध्ये घेणार एन्ट्री
दरम्यान, वाघाचे पंजे घातलेले दिसल्यानंतर ही सार्वजनिक तक्रार होती. तक्रारीनंतर, आम्ही तपासासाठी कोमाघट्टाजवळील 'बिग बॉस स्टुडिओ'मध्ये गेलो आणि अधिकाऱ्यांना लॉकेट सोपवण्याची विनंती केली. काही वेळ विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी ते आमच्याकडं देण्याचं मान्य केलं, असं उप वनसंरक्षक रवींद्र कुमार यांनी सांगितलंय.