Bigg Boss 16 : शकिरा सोबत Salman Khan ने धरला ठेका, VIDEO आला समोर

सलमान खानने शकिरा सोबत लावेल ठूमके, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Updated: Sep 30, 2022, 09:58 PM IST
 Bigg Boss 16 : शकिरा सोबत Salman Khan ने धरला ठेका, VIDEO आला समोर  title=

मुंबई : बिग बॉसचा 16 (Bigg Boss 16) सीझन सुरु होण्यास अवघे काही तास उरले आहेत. उद्या शनिवारी रात्री 9.30 वाजता कलर्स टीव्हीवर हा शो दाखवला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यात आता शोचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 

बिग बॉसचा (Bigg Boss 16)  प्रीमियर एपिसोड 1 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी रात्री 9.30 वाजता कलर्स टीव्हीवर दाखवला जाईल. त्याच वेळी, आता शोचा एक नवीन प्रोमो देखील शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये या सीझनमध्ये राजस्थानची शकिरा गोरी नागोरी (Gori Nagori) देखील सहभागी होणार असल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये गोरी सलमान खानसोबत (Salman Khan) मस्ती करताना आणि डान्स करताना दिसत आहे. 

प्रोमोमध्ये काय?
शोच्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान डान्सर गोरी नागोरीच्या (Gori Nagori) स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. डान्सनंतर गोरी नागोरी सलमान खानला (Salman Khan) राजस्थानी शिकवताना दिसत आहे.  या फनी प्रोमोला खूप पसंती दिली जात आहे.

दरम्यान हरियाणाची सपना चौधरी ज्या प्रकारे प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे राजस्थानची गोरी नागोरी (Gori Nagori) प्रसिद्ध आहे या दोन्ही डान्सर्स यूट्यूब आणि सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

तसेच बिग बॉस शो सुरु व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये शोची उत्सुकता वाढली आहे.