'बिग बॉस 15' विजेती तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तेजस्वी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Updated: Aug 8, 2022, 02:06 PM IST
'बिग बॉस 15' विजेती तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी चित्रपट, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) ची विजेती आणि 'नागिन 6' ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावर आपली छाप सोडल्यानंतर तेजस्वी आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तेजस्वीचा कस्तुरी हा पाहिला मराठी चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तेजस्विनं चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.  

तेजस्वी ही सोशल मीडयावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तेजस्वीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे. चंचल मनाची प्रेमकथा, असं मन कस्तुरी रे चित्रपटाबद्दल म्हणता येईल. तेजस्वी प्रकाशने आत्तापर्यंत 'संस्कार -धरोहर अपनों की', 'स्वरांगिनी- जोडे रिश्तों के सूर', 'पहरेदार पिया की', 'सिलसिला बदलते रिश्तों का', 'नागिन' अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तेजस्वीच्या चाहत्यांसाठी तिचा हा मराठी चित्रपट एक ट्रीट असेल. तेजस्वी सोबत या चित्रपटात अभिनय बेर्डे आहे. 'ती सध्या काय करते', 'अशी ही आशीकी' आणि 'रम्पाट' नंतर अभिनयच्या नव्या रोमँटिक चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चित्रपटाची पटकथा ही लेखन आणि दिग्दर्शन संकेत मानेनी (खारी बिस्कीटचा लेखक) केले आहे. तर अनेक वेगवेगळे मराठी चित्रपट आणणाऱ्या नितीन केणी यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मुव्ही स्टुडिओजने याची प्रस्तुती केली आहे. मुंबई मुव्ही स्टुडिओज यांनी आत्तापर्यंत मराठीत 'लोचा झाला रे' , 'शेरशिवराज', मल्याळममध्ध्ये 'पाथम वळवू' असे वेगवेगळे चित्रपट आणले आहेत. तर निर्माते नितीन केणी 'गदर', 'रुस्तम', 'सैराट', 'शेरशिवराज-स्वारी अफजलखान' या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत.  त्याचबरोबर वेंकट आर. अट्टीली आणि मृत्यूंजय किचंबरे यांनी 'मन कस्तुरी रे' या चित्रपटाची निर्मीती केली आहे. निशीता केणी आणि करण कोंडे हे या चित्रपटाचे सहनिर्मीते आहेत. तर यूएफओ मूव्हीज या चित्रपटाचे वितरक पार्टनर आहेत.