Bigg Boss 15: राकेश बापट रुग्णालयात दाखल, या गंभीर आजारामुळे वेदना असह्य

शमिता शेट्टीसोबतचं राकेशचा चाहता वर्ग चिंतेत, नक्की काय झालय अभिनेत्याला?  

Updated: Nov 10, 2021, 11:09 AM IST
Bigg Boss 15: राकेश बापट रुग्णालयात दाखल, या गंभीर आजारामुळे वेदना असह्य  title=

मुंबई :  'बिग बॉस ओटीटी'मुळे अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी तुफान चर्चेत आले. 'बिग बॉस 15'मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री करणाऱ्या राकेश बापटला मध्येच शो सोडावा लागला आहे. राकेशला किडनी स्टोनमुळे तीव्र वेदना असह्य झाल्या होत्या . त्यानंतर राकेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. राकेश लवकर ठिक होवून शोमध्ये भाग घेवू शकतो असं देखील सांगण्यात आहे. त्यामुळे आता राकेश चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

राकेशने  मैत्रिणी नेहा भसीनसोबत शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. त्याला पाहून त्याची प्रेमिका आणि अभिनेत्री शमिता शेट्टी खूप खुश झाली. राकेशला पाहाताचं तिने त्याला मिठी मारली आणि रडली. इटाईम्सच्या रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 15' च्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, राकेशला 8 नोव्हेंबरच्या रात्री वेदना असह्य  झाल्यामुळे 9 नोव्हेंबर रोजी  मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून लवकरच बरा होऊन शोमध्ये परतण्याची शक्यता आहे. सांगायचं झालं तर राकेश बापटने दिवाळीच्या आठवड्यात जेव्हा गोरिला ड्रेस घालून घरात प्रवेश केला तेव्हा प्रेयसी शमिताला आश्चर्यचकित केले. त्याने 'बिग बॉस ओटीटी' स्पर्धक नेहा भसीनसोबत एन्ट्री केली. तेव्हा देखील ही जोडी तुफान चर्चेत आली. 

बिग बॉसने नुकतीच घरामध्ये राकेश-शमितासाठी एक सुंदर डेट आयोजित केली होती.  दोघेही घरातील इतर सदस्यांव्यतिरिक्त एकमेकांसोबत वेळ घालवताना खूप आनंदी दिसत होते. आता राकेश पुन्हा शोमध्ये कधी परतणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.