Bigg Boss 15 : जंगलात रंगली कुस्ती...काही स्पर्धक जखमी व्हिडीओ

Bigg Boss 15 : जंगलात भांडण आणि कुस्ती...खेळा दरम्यान काही स्पर्धक जखमी 

Updated: Oct 15, 2021, 10:37 PM IST
Bigg Boss 15 : जंगलात रंगली कुस्ती...काही स्पर्धक जखमी व्हिडीओ title=

मुंबई: टीव्हीवरील प्रसिद्ध शो बिग बॉमध्ये मोठा ट्वीट्स येणार आहे. कारण बिग बॉस 15 मध्ये जंगलात स्पर्धकांमध्ये कुस्ती रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. स्पर्धकांनी जंगलाचा आखाडा केला आहे. बिग बॉसमध्ये अनेक वेळा स्पर्धक आपापसात येऊन लढत असतात. मात्र यावेळी झालेली मारमारी जरा जास्त मोठी होती. यावेळीही असेच काहीसं बिग बॉसच्या घरात घडलं आहे.

बिग बॉसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पर्धक एकमेकांशी लढताना दिसत आहेत. प्रत्येकजण एकमेकांना खेचून मागे टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. या भांडणामध्ये काही स्पर्धक जखमी देखील झाल्याचंही सांगितलं जात आहे.

दीड लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आज बिग बॉस 15 मध्ये स्पर्धक आखाड्यात उतरणार आहेत असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये करण कुंद्रा आणि बाकी स्पर्धकही एकमेकांवर भारी पडताना दिसत आहेत. 'बिग बॉस 15'चा हा दुसरा आठवडा आहे. पहिल्या आठवड्यात मॉडेल आणि अभिनेता साहिल श्रॉफला कमी मतांमुळे शो सोडावा लागला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)