'बाहुबली'मधील अभिनेत्रीसोबत बिग बॉस WINNER रुबिना दिलैकची होतेय तुलना!

रुबिनाने हा लूक करतानाचा एक मेकअप व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाये. 

Updated: Jul 7, 2021, 02:23 PM IST
'बाहुबली'मधील अभिनेत्रीसोबत बिग बॉस WINNER रुबिना दिलैकची होतेय तुलना! title=

मुंबई : बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलैक तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. त्यात तिच्या स्टाईलिंगमुळे ही बऱ्याचदा सगळ्याचं  लक्षवेधून घेत असते. बिग बॉसच्या 14 व्या पर्वात रुबिनाने प्रेक्षकांना आपल्या जॉली आणि तितक्याच आक्रमक अंदाजाने आपल्या प्रेमात पाडलं, आणि विजेतेपदाचा  मान पटकावला. 

रुबिना सोशल मीडियावरील देखील कमालीची अॅक्टीव्ह आहे. तिच्या एकापेक्षा एक अशा हटके पोस्टमुळे ती चर्चेत दिसून येते.

नुकताच रुबिनाने एक ट्रासफोर्मेशन व्हिडिओ शेअर केलाये. ज्यात तिचा रॉयल अंदाज पाहायला मिळतोयं. पण रुबिनाच्या या लूकची तुलना ही बाहुबली सिनेमातील  अभिनेत्रीसोबत केली जातेयं.  बाहुबलीच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णनसोबत करण्यात येतेय. शिवगामीचा रॉयल अंदाज सगळ्यांनाच ठावूक  आहे.

रुबिनाने हा लूक करतानाचा एक मेकअप व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाये. त्यात अगदी भरजरी साडीपासून ते गोल्डन ज्वेलरी आणि कपाळावर मोठी टिकली  लावली आहे. तिच्या लूकची चांगलीच चलती पाहायला मिळतेयं. 

बिग बॉस 14 च्या विजेतेपदाचा मान मिळवल्यानंतर रुबिनाने अनेक मोठमोठ्या ब्रॅण्डसाठी काम केलं. काही गाण्यांचे अल्बम देखील करण्याची संधी रुबिनाला  मिळाली.