VIDEO : गुडघ्यांवर बसून अनूप जलोटा जसलीनला म्हणाले, I Love You

पाहा हा व्हिडिओ 

VIDEO : गुडघ्यांवर बसून अनूप जलोटा जसलीनला म्हणाले, I Love You  title=

मुंबई : बिग बॉसच्या घरात 2 दिवसांपूर्वी अनूप जलोटा आणि जसलीनमध्ये एका टास्कदरम्यान वाद झाला. मात्र हा रूसवा फार काही टिकला नाही. अगदी दुसऱ्याच दिवशी  या दोघांमधील रुसवा दूर झाला. पण जसलीनने आपले कपडे आणि मेकअपची अनूप यांच्याकरता कुर्बानी न दिल्यामुळे ते थोडे नाराज झाले होते. पण आता अनूप जलोटा एका रोमँटिक अंदाजात दिसरणार आहे. 

या घरात अगदी विचीत्र जोडी म्हणून अनूप - जसलीनकडे पाहिलं जातं. आता अनूप जसलीनला एक रोमँटिक डेट करताना दिसणार आहे. जसलीनला अगदी गुडघ्यावर बसून I Love You म्हणण्यापासून ते अगदी रोमँटिक डान्सकरेपर्यंत ते समोर आले आहेत. 

अनूप रागावलेल्या जसलीनला आज प्रपोझ करणार आहेत. गुलाबाचं फूल देऊन ते तिला प्रपोझ करणार आहे. आजच्या या एपिसोडची ही खास झलक वरील व्हिडिओत पाहा.