Bigg Boss 12 : अनूप जलोटा यांना मिळतं एवढं मानधन

तुम्हाला मानधन बघून बसेल धक्का 

Bigg Boss 12 : अनूप जलोटा यांना मिळतं एवढं मानधन  title=

मुंबई : यंदा बिग बॉस एका नव्या संकल्पनेसह समोर आलं आहे. सिझन 12 मध्ये दोन टीम बनवण्यात आली यामध्ये काही सिंगल स्पर्धक आणि काही स्पर्धकांच्या जोड्या बोलवण्यात आल्या. दरवेळीप्रमाणे या सिझनमध्येही अनेक टास्क होत आहेत. त्या टास्कमध्ये असंख्य वाद देखील होत आहे. तर अनेक जोड्या आणि कलाकारा एकमेकांशी वाद करताना दिसत आहेत. या शोमध्ये येताना कलाकारांच्या लोकप्रियतेवर त्यांच मानधन ठरलं जातं. 

अशी माहिती मिळतेय की सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धकाचं नाव आहे अनूप जलोटा. बॉलिवूडलाइफ डॉट कॉमच्या माहितीनुसार, भजन सम्राट अनूप जलोटा एका आठवड्याचे तब्बल 45 लाख रुपये घेतात. कारण या शोच्या मेकर्सचं असं म्हणणं आहे की, या शोला ज्येष्ठ मंडळींनी देखील पहावं. 

युवा वर्ग बिग बॉस या शोचे पहिलापासूनच चाहते होते. आता मेकर्स या शोला एक फॅमिली ड्रामा बनवू इच्छित आहेत. त्यामुळे या शोच्या टीआरपीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याच कारणामुळे या शोमध्ये अनूप जलोटा यांना घेण्यात आलं आहे. अनूप जलोटा यांनी आपल्या गर्लफ्रेंड जसलीनसोबत नातं तोडण्याची गोष्ट केली होती. आणि याची भरपूर चर्चा झाली. 

मात्र पुढच्या दिवसांत सगळं ठिक झालं. अनूप जलोटा यांच्यानंतर सर्वाधिक फी आकारणारा करणवीर बोहरा असून करण एका आठवड्याचे 20 लाख रुपये फी आकारतो. तिसऱ्या क्रमांकावर 'ससुराल सिमर का' मधील सून दीपिका कक्कड आहे. दीपिका एका आठवड्यासाठी 15 लाखांच मानधन घेते. तर श्रीसंथ असा कलाकार आहे जो सर्वात कमी मानधन आकारतो. माजी क्रिकेटर असलेला श्रीसंथ अनेक विवादात अडकला पण श्रीसंथ आठवड्याचे 5 लाख रुपये आकारतो.