CONFIRM: विक्की आणि कतरिनाच्या नात्यावर या अभिनेत्याकडून मोठा खुलासा

विक्की आणि कतरिना यांच्या नात्याच्या अफवा पसरल्या तेव्हा त्यांना दिवाळीच्या पार्टीमध्ये एकत्र एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.

Updated: Jun 9, 2021, 11:33 AM IST
CONFIRM: विक्की आणि कतरिनाच्या नात्यावर या अभिनेत्याकडून मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif)च्या नात्याची चर्चा सध्या सर्वत्र वाऱ्यासारखी पसरत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. शिवाय दोघेही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत असतात. काही दिवसांपूर्वी विक्की, कतरिनाला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. तेव्हा देखील त्याला स्पॉट करण्यात आलं होतं. पण विक्की आणि कतरीनाने त्यांच्या नात्याची घोषणा केली

जेव्हा विक्की आणि कतरिना यांच्या नात्याच्या अफवा पसरल्या तेव्हा त्यांना दिवाळीच्या पार्टीमध्ये एकत्र एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा सोशल मीडियावर त्यांचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता या दोघांच्या नात्यावर अभिनेता हर्षवर्धन कपूरने मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे विक्की आणि कतरीना पुन्हा चर्चेत आले आहेत. 

हर्षवर्धन म्हणाला, 'विक्की आणि कतरीना एकमेकांना डेट करत आहे.' त्यानंतर हर्षवर्धनला विचारलं की, विक्की आणि कतरिना त्यांच्या नात्याची घोषणा का करत नाहीत? यावर हर्षवर्धन म्हणाला, 'दोघे त्यांच्या नात्याचा खुलासा का करत नाहीत. या मागचं कारण मला माहिती नाही.' हर्षवर्धनच्या वक्तव्यानंतर विक्की आणि करतरीनाच्या चाहते त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी इच्छूक आहेत. 

विक्की आणि कतरिना यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कतरिना कैफ 'टायगर 3' मध्ये सलमान सोबत आणि 'सूर्यवंशी'मध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तर विकी कौशल फिल्म 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' मध्ये सारा अली खानसोबत दिसणार आहे. या सिनेमासोबतच सरदार उधम सिंह आणि फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.