'बिग बॉस' वर असलेली अश्लिलतेची केस रद्द करण्यात आली !

मुंबई उच्च न्यायालयाने मनोरंजन टीव्ही चॅनेल आणि रियालिटी शो बिग बॉस चे निर्माते एंडेमोल इंडिया प्राइवेट लिमिटेड विरुद्ध २००८ मध्ये अश्लीलता आणि महिलांचे गैर चित्रीकरण यासंदर्भात केस केली होती. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 26, 2017, 10:14 PM IST
'बिग बॉस' वर असलेली अश्लिलतेची केस रद्द करण्यात आली ! title=

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मनोरंजन टीव्ही चॅनेल आणि रियालिटी शो बिग बॉस चे निर्माते एंडेमोल इंडिया प्राइवेट लिमिटेड विरुद्ध २००८ मध्ये अश्लीलता आणि महिलांचे गैर चित्रीकरण यासंदर्भात केस केली होती. २००८ मध्ये अंधेरी पोलीस स्टेशनला २९२ आणि २९४ या कलमाखाली केस दाखल केली होती. 

ही केस मुंबई प्रदेश युवा कांग्रेसचे प्रमुख सुनील अहीर यांनी केली होती. त्यांनी हा शो पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की या शो मध्ये अश्लीलता आणि महिलांचे गैर चित्रीकरण दाखवण्यात येते. 

परंतु, या केसमध्ये अनेक त्रुटी असल्याने ही केस रद्द करण्यात आली आहे.