बिग बॉस फेम अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशुट ठरतोय चर्चेचा विषय, असं फोटोशूट कदाचित कोणीही केलं नव्हतं

नुकतीच ती बीग बॉस हिंदीमध्ये सहभागी झाली होती. 

Updated: Aug 17, 2022, 07:23 PM IST
 बिग बॉस फेम अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशुट ठरतोय चर्चेचा विषय, असं फोटोशूट कदाचित कोणीही केलं नव्हतं title=

मुंबई: सोशल मीडियावर आजकाल अभिनेत्रींचे बोल्ड फोटोशूट हा एक चर्चेचा विषय असतो. त्यातच नुकत्याच एका अभिनेत्रीने मिनी स्कर्ट घालून आपले बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ही फक्त भोजपुरीचं नाही तर हिंदी टेलिव्हिजन मालिकांतून तसेच रिएलिटी शोज्समधून काम करते. नुकतीच ती बीग बॉस हिंदीमध्ये सहभागी झाली होती. 

आपले हटके फोटोशूट ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने इन्टाग्रामवर शेअर केलेलं बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ठरतोय. बीग बॉस फेम अभिनेत्री मोनालिसा सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने तिच्या फॅन्समध्ये चर्चेत असते तसेच तिचा लुक पाहून तिचे सगळेच चाहते तिच्यावर फिदा असतात. 

मोनालिसाचा बोल्डनेस थांबवण्याचं नावंच घेत नाहीये तर दिवसेंदिवस तिचा बोल्डनेस वाढत जातोय. नुकतेच तिने मिनी स्कर्टमध्ये आपले हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातून तिचे फॅन फोलोइंगही दिवसेंदिवस वाढते आहे. 

आता पुन्हा एकदा मोनालिसाचा सिझलिंग लूक पाहायला मिळाला आहे. या फ्रेश फोटोंमध्ये मोनालिसा हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घातलेली दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आणि तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले. यासोबत मोनालिसाने मॅचिंग कानातले घातले आहेत.

ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे. या लूकमध्ये मोनालिसा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना तिच्या या फोटोंंवरून नजर हटवता येत नाहीये. काही वेळातच या फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता त्याचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.