मुंबई : हल्लीच्या दिवसांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून करमणुकीची मोठी गरज भागवली जाते. असे बरेच कंटेंट क्रिएटर्स आहेत जे बहुविध प्रकारचा कंटेंट तयार करुन तुमच्याआमच्या मनोरंजनासाठी सातत्यानं काहीतरी नवं घेऊन येत आहेत.
यातलंच एक नाव आहे, प्राजक्ता कोळी हिचं. Mostlysane ही तिची आणखी एक ओळख. इन्स्टाग्रामवर प्राजक्ताचे 4.7 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर युट्यूबवर तिचे 6.58 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत.
प्राजक्तानं Vinayak Ganesh Vaze Autonomous College of Arts, Science & Commerce (मुंबई युनिवर्सिटी) येथून पदवी शिक्षण घेतलं आहे. ती रेडिओ इंटर्न म्हणूनही काम करत होती.
कुशा कपिला हे या यादीतलं आणखी एक नाव. 'बिल्ली मासी' या काल्पनिक पात्रासाठीही ती ओळखली जाते. साऊथ दिल्लीतून तिनं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तर, इंद्रप्रस्थ कॉलेज (दिल्ली) येथून तिनं इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी ग्रहण केली आहे. फॅशन टेक्नॉलॉजीमध्येही तिनं मास्टर्सचं शिक्षण घेतलं.
डॉली सिंग हीसुद्धा या युट्यूबर्सच्या यादीत कायम लोकप्रियता मिळवते. डिजिटल कंटेंट क्रिएटर, एक्ट्रेस, फॅशन ब्लॉगर अशी तिची ओळख. दिल्ली विश्वविद्यालय आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT)येथून तिनं शिक्षण घेतलं आहे.
युवा कंटेंट क्रिएटर्समध्ये भुवन बाम याची नव्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. हिस्ट्री ऑनर्स मधून त्यानं पदवी शिक्षण घेतलं आहे. शास्त्रीय संगीतातही तो पारंगत आहे. भुवन फार आधी एका रेस्तराँमध्ये गाणं गायचा हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
यात एक बाब लक्ष देण्याजोगी आहे की ही मंडळी आज करिअरमध्ये फार दूरवर यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत. शिक्षणाचाही यात महत्त्वाचा वाटा आहे, असं म्हणायला हरकत नाही.