कर्करोगामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबाचं सुख हरपलं, आजही 'या' गोष्टीची भीती

असं दुःख कोणाच्या आयुष्यात नको...   

Updated: Jul 17, 2022, 10:08 AM IST
कर्करोगामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबाचं सुख हरपलं, आजही 'या' गोष्टीची भीती title=

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट क्षण येत असतात. फक्त सर्वसामान्य जनताच नाही, तर सेलिब्रिटींच्या आयुष्यात अशी वेळ येते, ज्यामुळे त्यांना देखील मोठा धक्का बसतो. असाचं एक क्षण अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या आयुष्यात आला. भूमीच्या वडिलांचं कर्करोगामुळे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला.  भूमी 18 वर्षांची असताना अभिनेत्रीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. भूमीच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ होता, पण या वाईट प्रसंगातून मी खूप काही शिकले... असं देखील भूमी म्हणाली. 

भूमी पेडणेकरचे वडील राजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्राचे माजी कामगार मंत्री म्हणून काम पाहिलं. एकदा भूमी पेडणेकरने तिच्या सर्वात मोठ्या भीतीबाबत सांगितलं. भूमी पेडणेकरला अंधाराची खूप भीती वाटते. ती अंधाऱ्या खोलीत एकटी राहू शकत नाही. असं खुद्द भूमीने एका मुलाखतीत सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भूमीच्या करियरबद्दल सांगायचं झाल तर, भूमी पेडणेकर ही आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भूमी स्त्रीभिमुख सिनेमांना देते. भूमी पेडणेकरने 2015 साली 'दम लगा के हईशा' या सिनेमातून करियरची सुरुवात केली. 

पहिल्याच सिनेमासाठी भूमीला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'टॉयलेट', 'सांड की आँख' यांसारख्या अनेक सिनेमातून तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. भूमी पेडणेकरच्या धाकट्या बहिणीचे नाव समिक्षा पेडणेकर आहे. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.