भूलभुलैया चित्रपटाचा रिमेक, अक्षयची जागा घेणार बॉलिवूडचा हा चॉकलेट बॉय

अक्षय कुमारची जागा कोण घेणार ?

Updated: Jun 14, 2019, 04:59 PM IST
भूलभुलैया चित्रपटाचा रिमेक, अक्षयची जागा घेणार बॉलिवूडचा हा चॉकलेट बॉय title=

प्रेरणा कोरगांवकर, झी मीडिया, मुंबई : अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या भूलभुलैया या चित्रपटानं प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं होतं. आता या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दहा वर्षांपूर्वी आलेला 'भूलभुलैया' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटातील खिलाडी अक्षय कुमारची हुशार डॉक्टरची भूमिका असो किंवा मग विद्या बालनची सर्वांना थरकाप आणणारी भूमिका. या जोडीनं प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं होतं.

या चित्रपटातील राजपाल यादवची छोटे पंडीत ही विनोदी भूमिकादेखील प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणारी ठरली. विशेष म्हणजे चित्रपटातील 'हरे राम हरे राम' या गाण्यालादेखील प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

बॉ़लिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यन. 'सोनु के टिट्टु की स्विटी', 'लुका छुपी' या चित्रपटातील कार्तिकच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. त्यामुळे कार्तिकला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. 

'भूलभुलैया'च्या सिक्वेलमध्ये कार्तिक अक्षय कुमारची जागा घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे. याआधी या भूमिकेसाठी विकी कौशल, राजकुमार राव, आयुषमान खुराणा या अभिनेत्यांची नावदेखील चर्चेत होती. सगळेच सध्याचे आघाडीचे अभिनेते आहेत. पण त्यात कार्तिकनं बाजी मारल्याचं कळतं आहे.

सध्या 'लव आज कल'च्या सिक्वेलचं शुटींगदेखील सुरु आहे..या सिक्वेलमध्ये कार्तिक मुख्य भूमिका साकारतो आहे. त्यामुळे सध्या कार्तिककडे सिक्वेल्सची रांग लागली आहे असं म्हणायला काही हरकत नाही.