Bhulaiyaa 2 जगभरातील थिएटरमध्ये बोलबाला; Box Office वर जबरदस्त कलेक्शन

'भूल भुलैया 2' या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. 

Updated: Jun 6, 2022, 10:10 PM IST
Bhulaiyaa 2 जगभरातील थिएटरमध्ये बोलबाला; Box Office वर जबरदस्त कलेक्शन title=

मुंबई : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर कार्तिक आणि कियाराच्या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत आणि ही मालिका अजूनही सुरूच आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कार्तिकच्या चित्रपटाने जगभरात 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. याची माहिती स्वतः कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.

कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, वर्ल्ड वाइड कलेक्शन 200 कोटींच्या पुढे गेलं आहे आणि भारतातील कलेक्शन 154.82 कोटी आहे. हे पोस्टर शेअर करत अभिनेत्याने लिहिलं 'Amije Forever Tomar'. 

'भूल भुलैया 2' रिलीज होऊन 3 आठवड्यांहून अधिक काळ लोटला असून त्याची कमाई थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कार्तिकचा चित्रपट 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. ज्यानंतर कार्तिक आणि त्याचे चाहते खूप खुश आहेत. हा चित्रपट ज्या प्रकारे 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. ती वेळ दूर नाही जेव्हा तो भारतातच 200 कोटींचा टप्पा पार करेल. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून 'भूल भुलैया 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केलं आहे. त्यांनी सांगितलं की हा चित्रपट 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

भूल भुलैया 2 बद्दल बोलायचं झालं तर, 2007 मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहे.