प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री 6 महिन्यांपासून बेरोजगार, म्हणाली...

'कसौटी जिंदगी के 2' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' यांसारख्या टीव्ही मालिकांमधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री बेरोजगार आहे.

Updated: Jun 6, 2022, 09:51 PM IST
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री  6 महिन्यांपासून बेरोजगार, म्हणाली... title=

मुंबई : एरिका फर्नांडिस ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आणि ती अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियाच्या चर्चेत असते. एरिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे तिचं विधान, त्यानुसार ती 6 महिन्यांपासून बेरोजगार आहे.

एरिकने 'कसौटी जिंदगी के 2' आणि 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' सारख्या टीव्ही मालिकांमधून आपली छाप पाडली. त्याचबरोबर ती आता चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याच्या विचारात आहे. मात्र, तिला काम मिळण्यातही अडचण येत असून, यामुळे ती ६ महिन्यांपासून बेरोजगार आहे.

यामुळे काम मिळत नाही
एका मुलाखतीमध्ये बोलताना एरिका म्हणाली की, तिला टीव्ही आणि ओटीटीमधून काम मिळत आहे. पण त्यात खूप बोल्ड सीन्सची मागणी केली जात आहे. जे मी करू शकत नाही आणि त्यामुळे मला काम मिळणं कठीण जात आहे. ती पुढे म्हणाली की, मी 6 महिन्यांपासून कामाच्या शोधात आहे. पण ती आणखी वाट पाहणार आहे. पण ती अशा भूमिका करू शकत नाही ज्यामध्ये जास्त बोल्ड सीन द्यावे लागतील.

बोल्ड सीन्समध्ये कोणतीही अडचण नाही
सोबतच तिने हे देखील सांगितलं की, सीमेत राहून बोल्ड सीन्स करायला आपल्याला काहीच हरकत नाही. पण तिला ऑफर केल्या जाणाऱ्या भूमिका खूप बोल्ड आहेत आणि तिने स्वतःसाठी काही मर्यादा आखल्याआहेत. त्यापलीकडे ती काम करू शकत नाही.