Kartik Aryan वर युरोपमध्ये आधार कार्ड दाखवण्याची वेळ का आली? काय आहे प्रकरण?

 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यन चांगलाच चर्चेत आला आहे. 

Updated: Jul 7, 2022, 09:45 PM IST
 Kartik Aryan वर युरोपमध्ये आधार कार्ड दाखवण्याची वेळ का आली? काय आहे प्रकरण?  title=

मुंबई : 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यन चांगलाच चर्चेत आला आहे. या सिनेमाच्या यशानंतर कार्तिक आर्यन युरोपमध्य़े विकेंडला गेला आहे. मात्र विकेंडसची मजा करताना त्याच्यासोबत एक विचित्रच घटना घडलीय. चक्क त्याला युरोपमध्ये आधार कार्ड दाखवण्याची वेळ आली होती. त्यामुळे ही नेमकी घटना काय घडलीय ती जाणून घेऊयात.  

अभिनेता कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया 2' 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला आहे. आता या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी कार्तिक त्याच्या टीमसोबत युरोपला पोहोचला आहे. मात्र युरोपमधून कार्तिकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.  

व्हिडिओत काय?
वायरल भयानीने या इन्टाग्राम पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक युरोपमध्ये रस्त्याच्या कडेला बसून आईस्क्रीम खात होता. तेव्हा एक चाहता त्याच्याकडे येतो आणि सेल्फीची मागणी करतो. कार्तिकही त्याच्या चाहत्याचे मन न दुखवता सेल्फी काढतो. पण नंतर तो चाहता कार्तिकला सांगतो की 'माझ्या मित्रावर विश्वास बसत नाही की तू कार्तिक आर्यन आहेस'. यावर अभिनेता म्हणतो- 'मी कार्तिक आर्यन आहे, आता मी काय आधार कार्ड दाखवू', असे त्याला प्रत्युत्तर देतो. 

दरम्यान कार्तिकच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच अभिनेत्री क्रिती सेननसोबत 'शेहजादा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.