Akanksha Dubey Suicide: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) मृत्यू प्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या ही हत्या नसून, आत्महत्या असल्याचंच दिसत असल्याचं सांगितलं आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, मृत्यूच्या रात्री आकांक्षाला हॉटेलच्या रुमपर्यंत सोडण्यासाठी कोण आलं होतं हा मोठा प्रश्न सध्या पोलिसांसमोर आहे. ही व्यक्ती 17 मिनिटं आकांक्षाच्या रुममध्ये होती.
आकांक्षा दुबेच्या आईने भोजपुरी गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंगविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या दोन्ही भावांचा शोध घेत आहेत.
पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र त्या रात्री आकांक्षाच्या रुममध्ये कोण होतं हे मोठं गूढ असून पोलिसांनी याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. याच व्यक्तीच्या भेटीनंतर आकांक्षा दुबे इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. या लाईव्हमध्ये ती सतत रडत होती. पोलिसांनी या हॉटेलमधील सीसीटीव्ही आपल्या ताब्यात घेतलं आहे.
आकांक्षाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या असल्याचा उल्लेख आहे. दुसरीकडे घटनेच्या तीन दिवसानंतरही पोलीस अद्याप समर सिंग आणि संजय सिंग यांना पकडू शकलेली नाही. पोलीस आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापे मारत आहेत.
आकांक्षा दुबेने रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. सोमेंद्र रेजिडन्सीच्या हॉटेल क्रमांक 105 मध्ये आकांक्षा दुबे थांबलेले होती. त्याच रुममध्ये पंख्याला गळफास घेत तिने आपलं जीवन संपवलं. दरम्यान आकांक्षा दुबेच्या आईने ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसंच भोजपुरीमधील प्रसिद्ध गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्यावर आरोप केला आहे.
समर सिंगने आकांक्षासह तीन वर्षांसाठी करार केला होता. एका अल्बमसाठी 70 हजार रुपये मिळत असताना तीन वर्षांत तिला एक रुपयाही देण्यात आला नव्हता. आकांक्षाची जवळपास दोन ते कोटी थकबाकी त्याच्याकडे होती. तसंच संजय सिंगने आकांक्षाला तुला गायब करेन अशी धमकी दिल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.
मधु दुबे यांच्या आरोपानुसार, समर सिंगचा भाऊ संजय सिंग याने नवी गाडी खरेदी केल्यानंतर आकांक्षाने त्याच्या स्टेटसवर कमेंट केलं होतं. यामध्ये तिने दुसऱ्यांच्या पैशावर मजा करताय असं म्हटलं होतं. यानंतर संजय सिंगने आकांक्षाला फोन करत धमकावलं होतं. तसंच त्यांच्यात कोणतंही नातं नव्हतं असं मधु दुबे यांनी स्पष्ट केलं आहे.