धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्री Akanksha Dubey ने स्वतःला संपवलं, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Akanksha Dubey End Her Life : लोकप्रिय अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (Akanksha Dubey) नं इतका मोठा निर्णय का घेतला हे कोणालाही कळलेलं नाही. आकांक्षाचं कालच भोजपुरी प्रसिद्ध अभिनेता पवन सिंगसोबत 'आरा कभी हारा नहीं' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं.

Updated: Mar 26, 2023, 05:53 PM IST
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्री Akanksha Dubey ने स्वतःला संपवलं, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह title=

Akanksha Dubey end her life : भोजपुरी लोकप्रिय अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (Akanksha Dubey) बनारसमध्ये एका हॉटेल रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. आकांक्षानं ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केल्या त्याचं नाव सोमेंद्र हॉटेल असे आहे. सारनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलिस चौकशी सुरु आहे. आकांशा ही 25 वर्षांची होती. तिच्या आत्महत्येचं कारण अजून समोर आलेलं नाही. 

आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार वयाच्या 25 व्या वर्षी आकांक्षानं आत्महत्या करत स्वत: चा जीव संपवला आहे. आकांक्षा दुबे ही लोकप्रिय अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर सक्रिय होती. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. आकांक्षानं कमी वयात अभिनय आणि डान्स करण्यास सुरुवात केली होती. आकांक्षानं मेरी जंग मेरा फैसला या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आकांक्षा 'वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करने वाले की 2' या चित्रपटांमध्ये दिसली होती. आकांशानं स्वत: ला संपवण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित झाली आहे. आकांक्षाच्या निधनानं भोजपुरी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आकांक्षाचं आज 26 मार्च रोजी भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगसोबत एक नवीन गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याचं नाव 'आरा कभी हारा नहीं' असं आहे. आकांक्षाच्या चाहत्यांना या बातमीवर विश्वास ठेवणं खूप कठीण झालं आहे की ज्या दिवशी गाणं प्रदर्शित झालं. त्यांनी तिचं गाणं पाहिलं आणि त्याच दिवशी तिच्या आत्महत्येची बातमी समोर आली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, एक महिन्यापूर्वी आकांक्षा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. आकांक्षानं व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं सह कलाकार समर सिंगसोबत फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. समर सिंगसोबत फोटो शेअर करत आकांक्षानं हॅपी व्हॅलेंटाइन्स डे असे कॅप्शन दिले होते. 

आकांक्षाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर, जेव्हा ती तीन वर्षांची होती तेव्हा ती आई-वडिलांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. तिच्या आई-वडिलांना तिला आईपीएस अधिकारी म्हणून पाहायचे होते. मात्र, आकांक्षाला अभिनय आणि डान्स करण्यात आवड होती. लहाणपणापासून आकांक्षाला स्वत: ला टीव्हीवर पाहण्याची इच्छआ होती. डान्स आणि अभिनयाच्या पॅशनसोबत तिनं भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आकांक्षानं आधी मुंबईत तिच शिक्षण पूर्ण केलं. दरम्यान, चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी आकांक्षाला तिची मैत्रिण पुष्पांजलि पांडेनं मदत केली होती.