भाऊ कदमला 'पुष्पा' जमला का? हा प्रचंड व्हायरल व्हीडिओ पाहून तुम्हीच सांगा

अभिनेता भाऊ कदमचा अभिनय सर्वांना मनमुराद हसवणारा असला, तरी आता भाऊ कदमच्या अभिनयाची चिकित्सा देखील मोठ्या प्रमाणात होवू लागली आहे. खऱ्या अर्थाने भाऊच्या अभिनयाचा कस लागण्याचा हा टप्पा आहे. 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे अगदी फिट बसले आहेत.

Updated: Jan 29, 2022, 09:54 PM IST
भाऊ कदमला 'पुष्पा' जमला का? हा प्रचंड व्हायरल व्हीडिओ पाहून तुम्हीच सांगा title=

मुंबई : अभिनेता भाऊ कदम हा तळागाळातून आलेला अभिनेता आहे, पण 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदमला मिळालेलं यश आणि अभिनयातून मिळालेली प्रतिष्ठा त्याला सतत हवेत ठेवत आली आहे. यात अर्थात झी मराठीचा मोठा वाटा आहे. असे अनेक अभिनेते देखील झी मराठीने घडवलेले आहेत, आणि अजूनही घडत आहेत आणि घडतील. पुष्पाचा भाऊ कदमचा हा चला हवा येऊ द्याचा व्हीडिओ भारतात यूट्यूबला नंबर १ ला ट्रेन्ड आहे.

अभिनेता भाऊ कदमचा अभिनय सर्वांना मनमुराद हसवणारा असला, तरी आता भाऊ कदमच्या अभिनयाची चिकित्सा देखील मोठ्या प्रमाणात होवू लागली आहे. खऱ्या अर्थाने भाऊच्या अभिनयाचा कस लागण्याचा हा टप्पा आहे. 'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे अगदी फिट बसले आहेत.

सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने एकानंतर एक सिनेमा काम केलं आणि प्रत्येक सिनेमात त्याने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं, तर त्याला स्टारडम प्राप्त होतं. मालिकांचं जगही त्यापेक्षा जास्त वेगळं म्हणता येणार नाही. मालिकेच्या प्रत्येक भागात प्रत्येक स्कीट हिट देणं, हे त्या अभिनेत्यांचं काम असतं, पण अभिनयाची हवा डोक्यातून जायला यायला हवी, ती बसून राहायला नको. 

तेव्हा भाऊ कदमला पुष्पा सिनेमातला हा पुष्पा जमला का? भाऊ कदम आणखी चांगला पुष्पा वठवू शकला असता का? हा पुष्पा वरवरचा वाटतो का? हास्य मालिकेत वरवरचाच अभिनय असावा का? हे तुम्ही हा व्हीडिओ पाहून सांगा, कारण कुणी कितीही समिक्षा केली, तरी प्रेक्षक मायबापच हे ठरवतात,  कुणाचा अभिनय कसा होतोय, नंतर टाळ्या शिट्यातर मिळतच राहतात, पण यातून अभिनयाचा उत्साह जिवंत राहायला हवा, तो गोंगाट वाटायला नको.