भर रस्त्यात भारती सिंगने गाडी थांबवून कोणाला धमकावलं?

भर रस्त्यात भारती सिंगवर का आली अशी वेळ...  

Updated: Feb 12, 2022, 03:58 PM IST
भर रस्त्यात भारती सिंगने गाडी थांबवून कोणाला धमकावलं? title=

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. भारती आणि हर्ष लिंबाचिया लवकरचं आई-बाबा होणार आहेत. पण प्रेग्नेंट असूनही भारतीने ब्रेक घेतलेला नाही. प्रेग्नेसीमध्ये देखील ती शूटिंग पूर्ण करत आहे. ती सध्या पती हर्षसोबत 'हुनरबाज' शोसाठी होस्ट करताना दिसते. दरम्यान तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये भारती फोटोग्राफर्सना धमकावताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये भारती कारमध्ये बसलेली दिसत आहे. तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅमेऱ्यामॅन तिला घेरतात. पाहा व्हिडीओ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, भारतीची कार भररस्त्यात थांबल्यामुळे मागून इतर गाड्यांच्या हॉर्नचा आवाज येतो, तेव्हा भारती मजेशीर अंदाजात फोटोग्राफर्सना धमकावते, 'तुमचा कॅमेरा खेचून घेईल...' सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.