भारती सिंहला गरोदरपणातच का सोडावी लागली मुंबई ?

 भारती मुंबईपासून लांब शिफ्ट झाली आहे.

Updated: Jan 14, 2022, 03:34 PM IST
भारती सिंहला गरोदरपणातच का सोडावी लागली मुंबई ?  title=

मुंबई : कोरोना व्हायरस पुन्हा एकदा झपाट्याने पसरत आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईत कोविड 19चे केसेसची वाढ पाहून कॉमेडियन भारती सिंगने मोठा निर्णय घेतला आणि काही दिवस मुंबईपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

गरोदरपणात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी तिने हे पाऊल उचललं आहे. याचा खुलासा खुद्द भारतीने केला आहे. भारती सिंग आजकाल तिच्या फार्महाऊसमध्ये पती हर्ष लिंबाचियासोबत शिफ्ट झाली आहे. पती हर्ष लिंबाचिया आणि भारती मुंबईपासून लांब शिफ्ट झाले आहेत.

मुंबईपासून लांब फार्महाऊसमध्ये शिफ्ट झाले भारती-हर्ष
भारती सिंगने युट्यूबवरील तिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. मुंबईत कोरोनाचा धोका खूप वाढत असल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं भारतीने सांगितलं. त्यामुळे स्वतःला कोरोनापासून वाचवण्यासाठी ती तिच्या फार्म हाऊसवर पोहोचली, जिथे ते शूट करून व्लॉग बनवणार होते. या व्लॉगमध्ये भारती आणि हर्ष लिंबाचिया यांची धमाल-मस्तीदेखील दिसत आहे.

प्रेग्नेंसी फेजला एन्जॉय करत आहे भारती सिंह 
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया एप्रिलमध्ये आई-वडील होणार आहेत. भारतीने इंस्टावर बेबी बंप दाखवणारे फोटोदेखील शेअर केले आहेत. सध्या भारती सिंग गरोदरपणाचा आनंद घेत आहे. भारती म्हणाली की, ती तिच्या ठरलेल्या तारखेपर्यंत काम करणार आहे.