Bharat Jadhav नं सोडली मुंबई? 'सपनो का शहर' सोडण्यामागचं खरं कारण समोर

Bharat Jadhav Moved to Kolhapur : भरत जाधवनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुंबई सोडण्याचं कारण सांगितलं आहे. ज्या भरतचं बालपण हे मुंबईत झालं त्यानं इतका मोठा निर्णय घेण्याचं नक्की कारण काय आहे? असा सवाल हा प्रत्येकालाच आला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 6, 2023, 10:48 AM IST
Bharat Jadhav नं सोडली मुंबई? 'सपनो का शहर' सोडण्यामागचं खरं कारण समोर title=
(Photo Credit : File Photo)

Bharat Jadhav Moved to Kolhapur : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता भरत जाधव हा त्याच्या अभिनयानासोबतच त्यांच्या कॉमिक अंदाजासाठी देखील ओळखले जातात. भरत जाधवचे नाटक आणि चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. कारण भरत जाधव म्हटलं की त्यात असणारे जोक तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणतात. भरत जाधव यांचे लाखो चाहते आहेत. पण भरत जाधवला आता कोणी मुंबईकर म्हणू शकणार नाही. कारण काही दिवसांपूर्वी तो मुंबईच्या बाहेर स्थायिक झाला आहे. मुंबईकरण होण्यासाठी किती लोक मेहनत करतात इथे हक्काचं घर हवं म्हणून प्रत्येक व्यक्ती स्ट्रगल करतो. मुंबईत सगळ आपल्याला खूप लवकर, पटकन आणि जवळच्या जवळ मिळतं. मग भरत जाधवनं मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला या विषयी सांगितले आहे. 

मुंबईत लहाणाचा मोठा झालेला भरत गावी का गेला? ज्या भरतला चाळीतलं जीवन आणि त्यात असलेला साधेपणा प्रचंड आवडायचा त्यानं हा निर्णय का घेतला. आता भरतनं मुंबई सोडत त्याची गावी कोल्हापुरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं कारण भरतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. भरतनं एका प्रतिष्ठीत माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत भरत म्हणाला, 'मुंबई हे शहर आता बिझनेस हब झाले आहे. मुंबईचा सध्या असलेल्या वेगाशी सगळं जुळवून घेणे मला कठीण वाटत आहे. त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझं वय सरत चाललं आहे. परंतु आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमावतो असे मला वाटू लागले.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे भरत म्हणाला, 'या सगळ्यासाठी करावी लागणारी धावपळ आता माझ्या वयाला झेपणारी नाही हे मला जाणवले. त्यामुळे पैसे तर कमवायचे पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो.' 

हेही वाचा : आई दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचे कळताच 15 वर्षीय Palak Tiwari ला बसला होता धक्का, म्हणाली 'मला कोणी...'

हिंदी चित्रपटसृष्टीत काम न करण्यावर प्रश्न विचारता भरत म्हणाला, माझ्याकडे हिंदीतली कामं फार आलीच नाहीत. असं नाही की आली नाही, एक आलं होतं पण नोकराची भूमिका होती. मी त्यासाठी नकार दिला. पण  'स्कॅम 2' या आगामी सीरिजमध्ये मी दिसणार आहे. तर या सीरिजमध्ये मी एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारतोय.'