मुंबई : 'भाबीजी घर पर है' या कॉमेडी शोमध्ये आजकाल गोरी मेम, अनिता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा पेंडसे अनेकदा व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. नेहाने गेल्यावर्षी जानेवारीत बॉयफ्रेंड शार्दुल बियाससोबत लग्न केलं होतं, त्यानंतर तिने आपल्या पतीबद्दल आणि विवाहित जीवनाबद्दल बर्याचदा चर्चा केल्या आहेत.
नेहाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, भविष्यात मी बोल्ड सीन किंवा न्यूड देण्यास टाळाटाळ करते कारण हे सगळं केवळ दृष्टीकोनातून आहे. याविषयी नेहा म्हणाली, 'जेव्हा मी एक निश्चित वयात होते तेव्हा मला असं वाटायचे की, त्या सिनेमात किस सीन नाही, न्यूड सीन नाही तर तो सिनेमा हिट होणार नाही, मात्र आता मला वाटतं की, जर माझ्याकडे टॅलेंट आहे तर मी माझ्या अभिनयाद्वारे हे दाखवू शकतो.
जागतिक सिनेमा आणि चांगले सिनेमा पाहिल्यानंतर मला एक गोष्ट समजली आहे की जर निर्माता योग्य असेल तर,स्क्रिप्टमध्ये सीन घेण्याची किंवा न्यूड सीनची खरोखरच मागणी असेल तर ती योग्यरित्या दाखवावी जर ते सीन चांगले नलतील तर मी तसे सीन करण्यास ईच्छुक नाही.
असे चित्रपट करणार नाही
नेहाने हे स्पष्ट केले की, ती पूर्णपणे लव्हस्टोरी सिनेमांत काम करु ईच्छिते मात्र किसिंग सीन्सवर आधारित चित्रपटांमध्ये काम करणार नाही असं तिने यावेळी स्पष्ट केलं. नेहा म्हणाली, 'मी कधीही अशा चित्रपटांचा किंवा आशयाचा भाग होणार नाही.
अशा प्रकारे बरेच चांगले बोल्ड सीन आहेत जे समोर आल्यानंतर निर्मात्यांनी त्यांना चांगल्याप्रकारे हाताळलं आहे. आपल्याला अशा सीनला पाहून वाईट देखील वाटत नाही. मी बोल्ड सीन आणि न्यूडसीनच्या विरूद्ध नाही मात्र ही दृष्टिकोनाची बाब आहे आणि मी चांगल्या कामासाठी तयार आहे.
नेहाने लॉकडाऊनविषयी बोलताना सांगितलं की, ती तिचा पती शार्दुलसोबत आपला वेळ कसा घालवायची, नेहा म्हणाली, 'माझं स्वतःच आयुष्य क मिनी लॉकडाउन आहे. लॉकडाऊनचा मला फारसा परिणाम झाला नाही परंतु माझा पती एक सामाजिक व्यक्ती आहे, म्हणून त्याचा त्याचा खूप परिणाम झाला.
आम्ही पूर्णपणे वेगळ्या विचारांचे मानव आहोत. मला वाटतं की एक कपल म्हणून आपल्यात एक चांगली अंडरस्टँडिंग आहे. आम्ही खोलीत एकत्र बसून, बोलू किंवा नं बोलता ऐकमेकांसोबत वेळ घालवू शकतो. तसंच नेहा म्हणाली की, लॉकडाउनमुळे त्यांच्या नात्यात मॅच्युरिटी घेवुन आलं.
दोन मुलांच्या बाबांसोबत केलं लग्न
नेहा पेंडसेने शार्दुलसिंग बियास यांच्याशी गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे लग्न केलं होतं. नेहाच्या नवऱ्याचं हे तिसरं लग्न आहे आणि तो आधीच दोन मुलींचा वडील आहे. नेहा आपल्या पतीविषयी बोलताना म्हणाली, 'शार्दुलच्या आयुष्यात बरेच चढ़ाव-उतार आहेत. शार्दुलचे हे तिसरं लग्न आहे आणि त्याला दोन मुली आहेत. शार्दूलच्या आधीच्या दोन्ही पत्नींना एक-एक मुलगी आहे.