'भाभी' मालिका फेम प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कॅन्सर, सोशल मीडियावर बाल्ड लूक शेअर करत सांगितला प्रवास

48 year old Actress Cancer battle : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. तिची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते हे भावूक झाले आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 11, 2023, 11:30 AM IST
'भाभी' मालिका फेम प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला कॅन्सर, सोशल मीडियावर बाल्ड लूक शेअर करत सांगितला प्रवास title=
(Photo Credit : Social Media)

Dolly Sohi Cancer : डॉली तिच्या कामामुळे नाही तर एका वेगळ्याच कामामुळे चर्चेत आहे. डॉलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. डॉलीनं यावेळी सांगितलं की ती एका गंभीर आजाराचा सामना करते. ही पोस्ट पाहिल्यानंतर तिची चाहते चिंतेत आहेत. त्यांनी या पोस्टवर कमेंट करत लवकरच डॉली ठीक होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

पाहा काय म्हणाली डॉली

डॉली सोहीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत तिचा बाल्ड लूकमधील फोटो शेअर केला आहे. यावेळी तिनं सांगितलं की ती सर्वाइकल कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करत आहे. ही पोस्ट शेअर करत डॉली म्हणाली, 'तुम्ही तुमचं प्रेम आणि आशीर्वाद पाठवलेत यासाठी आभार. आयुष्यात उतार-चढाव येतातच. पण जर तुमच्याकडे त्याच्याशी लढण्याची क्षमता आहे तर आपला प्रवास हा सोपा होतो. आता हे तुम्हाला ठरवायचं असतं की तुम्हाला तुमचा प्रवास कसा करायचा आहे. तुम्हाला तुमचा प्रवास इथेच संपवायचा आहे की यातून बाहेर पडायचं आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

डॉलीनं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या आजारपणावर वक्तव्य केलं. यावेळी डॉली सोही म्हणाली की, मला सहा ते सात महिन्यापूर्वी लक्षण दिसले होते. पण मला या आजाराच्या लक्षणांविषयी माहित नव्हतं आणि मी याकडे दुर्लक्ष केलं. काही काळानंतर जेव्हा त्रास होऊ लागला तेव्हा मी डॉक्टरांकडे गेले आणि टेस्ट केल्या. टेस्टच्या आधी तिला सांगण्यात आलं की तिला तिचं युटेरस काढावं लागणार. त्यानंतर डॉक्टरांनी पुढे टेस्ट केल्यातर असं समोर आलं की तिला सर्वाइकल कॅन्सर आहे. यानंतर तिच्यावर उपचार सुरु झाले. दरम्यान, डॉलीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि ती लवकरच ठीक होईल अशी आशा व्यक्त केली आहे. 

हेही वाचा : एवढ्या लवकर कसं काय? अनन्यानं घेतलेलं नवं घर पाहून फराह खानला वाटलं आश्चर्य

डॉली सिंहनं 'परिणीति' मधून तिच्या कमबॅकवर देखील वक्तव्य केलं आहे. डॉलीनं सांगितलं की तिनं कोलकत्ता आणि कश्मीरमध्ये ती तिची आगामी मालिका 'झनक' ची शूटिंग पूर्ण केली आहे. त्यानंतर जेव्हा ती मुंबईत आली तेव्हा तिला 'परिणीति' साठी ऑफर मिळाली. तर तो दोन्ही मालिका एकत्र करू शकत होती त्यामुळे तिनं दोन्ही मालिकांना होकार दिला.