दोन वेळा कॅन्सरवर मात, आता हृदयविकाराने गाठलं, अभिनेत्रीची ऐंद्रिला शर्मा व्हेंटिलेटरवर

Aindrali Sharma on Ventilator : अभिनेत्रीच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. चाहते देखील तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Updated: Nov 16, 2022, 08:51 PM IST
दोन वेळा कॅन्सरवर मात, आता हृदयविकाराने गाठलं, अभिनेत्रीची ऐंद्रिला शर्मा व्हेंटिलेटरवर title=

Aindrali Sharma Health update : मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री ऐंद्रिला शर्माची (Aindrali Sharma) प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी तिला हृदयविकाराचे अनेक झटके आले. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांच्या टीमने सांगितले. (Bengali actress Aindrila Sharma`s condition gets critical)

ऐंद्रिला शर्माला हावडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. तिला अचानक स्ट्रोक आल्याने मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या. त्यानंतर अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एंड्रिला शर्माने कॅन्सरसारख्या घातक आजाराशी दोनदा लढाई जिंकली आहे.

आंद्रिया शर्माला दुसऱ्यांदा कॅन्सर झाल्याचे निदान झाले तेव्हाही तिने हार मानली नाही. तिला केमोथेरपी देण्यात आली. त्यानंतर ती त्यातून पूर्णपणे बरी झाली. ऐंद्रीला शर्मानेही पुन्हा अभिनयाला सुरुवात केली होती. पण आता अभिनेत्रीची तब्येत पुन्हा बिघडली. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबासह चाहते ही चिंतेत आहेत.

ऐंद्रिला शर्माने अनेक बंगाली चित्रपटात काम केले. तिने झूमर या टीव्ही शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. ती अनेक OTT प्रोजेक्टवर देखील काम करत होती.