ऐश्वर्या आधी 'या' सुंदर मुलींसोबत अभिषेक बच्चनचं अफेअर

ऐश्वर्या आधी या सुंदर मुलींचं अभिषेकच्या मनावर राज्य...  

Updated: Feb 5, 2022, 03:21 PM IST
ऐश्वर्या आधी 'या' सुंदर मुलींसोबत अभिषेक बच्चनचं अफेअर  title=

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन आज 46वा वाढदिवस साजरा करत आहे. एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून आज अभिषेकची ओळख आहे. प्रोफेशनल लाईफ प्रमाणे त्याची खासगी लाईफसुद्धा प्रचंड चर्चेत होती. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आधी अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुंदर मुलींसोबत अभिषेक रिलेशनशिपमध्ये होता. जाणून घेवू त्याच्या गर्लफ्रेंडची लिस्ट...

अभिनेत्री करिश्मा कपूर
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या लव्हस्टोरीची आजही संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांचा साखरपुडाही झाला होता, पण नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते.

अभिनेत्री राणी मुखर्जी
अभिषेक आणि राणी यांनी 'कभी अलविदा ना कहना', 'बंटी और बबली' आणि 'युवा' सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली होती. शुटिंग दरम्यान त्यांच्यात प्रेमाचा गुलाब फुलला. पण दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. 
 
दीपानिता शर्मा 
दीपानिता शर्मा आणि अभिषेक जवळपास 10 महिने रिलेशनशिपमध्ये होते. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. 

जान्हवी कपूर
जान्हवी कपूर नावाच्या मुलीने अभिषेक बच्चनवर फसवणुकीचा आरोप केला होता. एवढेच नाही तर या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.  नंतर या प्रकरणाला पब्लिसिटी स्टंट म्हटलं गेलं.

अभिनेत्री ऐश्वर्या राय 
'और प्यार हो गया' सिनेमाच्या सेटवर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची भेट झाली होती. यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. याचदरम्यान त्यांची लव्हस्टोरीही सुरू झाली. 2007 मध्ये दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक आणि ऐश्वर्याला एक मुलगी आहे.