कास्टिंग काऊचमुळे 'या' अभिनेत्रीचा कलाविश्वाला रामराम

झगमगाट, ग्लॅमरच्या  दुनियेतील सत्य.

Updated: Sep 12, 2019, 01:44 PM IST
कास्टिंग काऊचमुळे 'या' अभिनेत्रीचा कलाविश्वाला रामराम title=

मुंबई : झगमगाट, ग्लॅमर असलेल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 'कास्टिंग काऊच'च्या घटना सर्रास घडत असतात. त्यामुळे अनेक कलाकारांना बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम ठोकावा लागतो. असंच काही घडलं आहे 'बडे अच्छे लगतो हो' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री चाहत खन्ना सोबत. पण आनंदाची गोष्ट म्हणजे ती 'प्रस्तानम' चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by CK (@chahattkhanna) on

आमची सहयोगी वेबसाइट डीएनए सोबत संवाद साधताना तिचे स्वत:सोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, 'मी अशा अनेक कलाकारांना ओळखते ज्यांनी परिस्थिती पाहुण मौन बाळगलं. पण असे भरपूर कलाकार आहेत ज्यांचे नाव #metoo मोहिमे अंतर्गत समोर आले नाही. जर अशा गोष्टींवर आवाज बुलंद करायचा असेल तर #metoo मोहिमेची प्रतिक्षा का?.'

होम प्रॉडक्शनच्या खाली साकारण्यात आलेल्या 'प्रस्थानम' चित्रपटामध्ये अनेक कलाकारांची मेजवानी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटात संजय दत्त शिवाय अभिनेता जॅकी श्रॉफ, मनीषा कोयराला, चंकी पांडे आणि अली फजल हे कलाकार भूमिका साकारणार आहेत.