Amitabh Bachchan : बॉलिवूड चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि स्वत: च्या हातानं स्वत: चं करिअर संपुष्टात आणलं. आज तुम्हाला अशा एका कलाकाराविषयी सांगणार आहोत, जो त्याच्या काळातील सगळ्यात मोठा कलाकार होता आणि अमिताभ बच्चनपासून धर्मेंद्र यांच्या पर्यंत सगळ्यांना टक्कर दिली. पण करिअरच्या पीकवर जाऊन अचानक चित्रपटात काम करणं सोडलं आणि सन्यास घेतला.
हा कलाकार दुसरा कोणी नसून विनोद खन्ना आहे. त्यांनी खलनायकाची भूमिका साकारत करिअरची सुरुवात केली आणि अनेक चित्रपटांमध्ये करिअरची सुरुवात केली होती आणि मग त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकरली. विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये स्वत: चं स्थान तेव्हा निर्माण केलं जेव्हा अमिताभ यांचीच चर्चा सुरु होती. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी एकाच वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
विनोद खन्ना यांनी 1968 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर अमिताभ बच्चन यांनी एकावर्षानंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण हळू-हळू विनोद खन्ना यांनी अमिताभ यांना लोकप्रियतेत टक्कर देण्यास सुरुवात केली. विनोद खन्ना यांची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांनी एक दिवस शूटिंग केली किंवा 20 दिवस शूटिंग केली तरी ते मानधन हे 35 लाख रुपयेच घ्यायचे. 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्या 'हेरा फेरी' या चित्रपटासाठी विनोद यांनी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घेतलं होतं. विनोद खन्ना यांना या चित्रपटासाठी अडीच लाख मानधन म्हणून मिळाले. तर अमिताभ बच्चन यांनी दीड लाख मानधन घेतलं होतं.
हेही वाचा : नागा चैतन्यासोबत घटस्फोटानंतर समांथा रुथ प्रभूनं आई होण्यावर केलं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला...'
रिपोर्ट्सनुसार, 'हेरा फेरी' या चित्रपटा दरम्यान, अमिताभ आणि विनोद खन्ना यांच्यात मतभेद असल्याचे बातम्या येऊ लागल्या होत्या. विनोद खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांच्या पेक्षा स्क्रीन टाइम आणि जास्त पैसे मागितले होते. खरंतर, त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यात 'परवरिश' आणि 'अमर अकबर अॅन्थनी' सारख्या चित्रपटांमध्ये सहभागी झाली होती.