मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास सहभाग असणारा आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमाच्या खास भागाचं नुकतच प्रसारण करण्यात आलं. शंभरहून अधिक राष्ट्रांमध्ये एकाच वेळी दाखवण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसादही मिळाला. रान वाटांवर अगदी सराईताप्रमाणे वावरणाऱ्या बेअर ग्रिल्सच्या साथीने मोदींची ही सफर प्रेक्षकांच्या मनात सुरुवातीपासूनच कुतूहल जागवून गेली होती.
कार्यक्रमाचा खास भाग प्रदर्शित झाल्यानंतर याच कुतूहलाचं रुपांतर हे विनोदी मीम्सने घेतलं. उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये मोदींसह बेअर एका सफरीला निघाला होता. या प्रवासादरम्यान, त्याने मोदींच्या बालपणाविषयी, त्यांच्या कामाविषयी आणि एक पंतप्रधान म्हणून असणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बेअरचे प्रश्न आणि त्याला पंतप्रधानांची उत्तरं अशा रुपात हा भाग पार पडला. ज्यानंतर सोशल मीडियावर अपेक्षित चित्र पाहायला मिळालं. या भागातील काही क्षण आणि दृश्य टीपत त्याचे अफलातून आणि विनोदी मीम्स अनेक पेजवरुन शेअर करण्यात आले. ज्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी मीम्स ठरले ते म्हणजे बेअर आणि मोदींमधील हिंदी- इंग्रजी संभाषणाविषयीचे.
Waiting for all the hilarious memes of #ManVsWild #NarendraModi pic.twitter.com/pCgLTxzwCR
— Arthropod (@drunkushh) August 11, 2019
Bear Grylls reaction when narendra modi speak in Hindi #ManVsWild pic.twitter.com/q8qaHX4pfr
— Er- Ramkishor katariya (@Ramkishorkatar2) August 12, 2019
Bear Grylls to Modi: You are the most important man in India. My job is to keep you alive.
SPG security guards:#ManVsWild #DiscoveryChannel pic.twitter.com/ADvEmOMGJq
— Sir Jadeja fan (@SirJadeja) August 12, 2019
#modiondiscovery
Conversation between Modi ji & Bear grylls : pic.twitter.com/bKuaUywnHY— चाचा चौधरी (@idhar_dekh_le) August 12, 2019
Who said this is Man vs wild? This is वन की बात! pic.twitter.com/YE1Ud6KAhW
— Hakuna Matata (@Shariph19) August 12, 2019
Discovery Channel after seeing the TRP...#ManVsWild pic.twitter.com/YEzVSOEL9R
— Yashraj Singh (@Yashraj15910095) August 12, 2019
#ManVsWild
Why did U do Man Vs Wild Modi Ji ?Modi Ji - pic.twitter.com/KTDNUyQXqn
— India ka Jones (@IndiaKaJones) August 12, 2019
Its top secret photo of #ManVsWild kejriwal ji also went there for sabut... . #modiondiscovery pic.twitter.com/qtIRVqTddW
— Paras Indian (@Paras_Indian) August 12, 2019
बेअरच्या प्रश्नांना मोदींनी हिंदीतून दिलेली उत्तरं पाहता आता यावर बेअरची काय प्रतिक्रिया असेल असाच प्रश्न प्रेक्षकांच्याही मनात घर करुन गेला. सोशल मीडियावर त्यावरच भाष्य करणारे मीम्स पाहायला मिळाले. ज्यासाठी बॉलिवूड चित्रपटांमधील विनोदी दृश्यांचा आधार घेतल्याचं पाहायला मिळालं. कोण म्हणतंय हे 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' होतं? हे तर होतं, 'वन की बात'.... असं म्हणत काही ट्विट करण्यात आले. तर, कोणी यामधून आपच्या अरविंद केजरीवाल यांनाही मागे ठेवलं नाही.