मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांनी 1991 मध्ये लग्न केले आणि त्यावेळी अमृता सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. असे असतानाही दोघांनी गुपचूप लग्न केले. लग्नाच्या वेळी सैफ 21 वर्षांचा आणि अमृता 33 वर्षांची होती.
13 वर्षांच्या लग्नानंतर अमृता आणि सैफचा घटस्फोट झाला. त्यावेळी सारा दहा वर्षांची होती आणि त्यांचा मुलगा इब्राहिम चार वर्षांचा होता. एका मुलाखतीत अमृताने सांगितले होते की, लग्नानंतर ती चार वर्षांपासून मुले होण्यास टाळाटाळ करत होती.
यामागे एकच कारण होते आणि ते म्हणजे तिचा पती सैफ अली खान. अमृताने सांगितले होते की, जेव्हा तिने सैफशी लग्न केले तेव्हा सैफ बॉलिवूडमध्ये स्ट्रगलच्या काळात होता.
सैफने मुलं घडवून कौटुंबिक जबाबदारीत अडकावं असं अमृताला वाटत नव्हतं. अमृता म्हणाली की, सैफच्या करिअरसाठी मला मुले होऊ द्यायची नाहीत. लग्नाच्या चार वर्षांनी सारा अली खानचा जन्म झाला आणि सहा वर्षांनंतर इब्राहिमचा जन्म झाला.
अमृता म्हणाली की, सैफ नेहमीच आपल्या मुलांसाठी जबाबदार असतो, पण लोकांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही.