बिग बॉस OTT मधील या स्टार सेलिब्रिटीकडून अखेर रिलेशनवर शिक्कामोर्तब

गर्लफ्रेंडसोबत लिपलॉकचा फोटो शेअर करत बिग बॉस OTT मधील स्टार सेलिब्रेटीनं चाहत्यांना दिली गोड बातमी

Updated: Oct 6, 2021, 08:23 PM IST
बिग बॉस OTT मधील या स्टार सेलिब्रिटीकडून अखेर रिलेशनवर शिक्कामोर्तब title=

मुंबई: बिग बॉस OTT मधील स्टार कंटेस्टंटने आपल्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब करून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. लोकप्रिय टीव्ही शो 'कुमकुम भाग्य'च्या दोन अभिनेत्यांनी एकत्र येऊन ही बातमी दिली आहे. 'बिग बॉस ओटीटी' स्पर्धक Zeeshan Khan शोमध्ये आर्यन खन्नाच्या भूमिकेतून घराघरात ओळखला जातो. त्याच शोची त्याची सह-कलाकार रेहना पंडितच्या प्रेमात Zeeshan वेडा आहे. या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल चाहत्यांना फोटो शेअर करून माहिती दिली आहे.

Zeeshan Khan आणि रेहना यांचा लिपलॉकचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या या आधी अनेक चर्चा देखील होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून दोघांनीही आपल्या नात्यावर खुलासा केला आहे. 

बुधवारी Zeeshan Khan याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याने लेडी लव्ह सोबत असं म्हणत लिपलॉकचा फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये रेहना आणि Zeeshan खूप रोमँटिक दिसत आहेत. त्यांचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांनाही खूप आवडला आहे. त्यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 

रेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. त्याने झीशानच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, 'शर्मी आय लव्ह यू डिअर बेबी तू आहेस आणि तू मला कायमचे प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद.' त्याचवेळी, रेहाना आणि झीशानचे चाहते फोटोवर लाईक करत आहेत. मित्र आणि चाहते या दोघांचंही अभिनंदन करत आहेत आणि कमेंट्समध्ये हार्टचे इमोजी पाठवत आहेत.