'बार्बी'च्या सौंदर्यापुढं Oppenheimer ची ताकद फिकी; केली विक्रमी कमाई

Oppenheimer Box Office Collection : ख्रिस्तोफर नोलानच्या 'ओपेनहाइमर' या चित्रपटाला बार्बीनं बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये टाकलं मागे. फक्त दोन दिवसाचा फरक तरी केली इतकी कमाई...

दिक्षा पाटील | Updated: Jul 24, 2023, 10:50 AM IST
'बार्बी'च्या सौंदर्यापुढं Oppenheimer ची ताकद फिकी; केली विक्रमी कमाई title=
(Photo Credit : Social Media)

Oppenheimer Box Office Collection : ख्रिस्तोफर नोलान यांचा 'ओपेनहाइमर' चित्रपट रॉबर्ट ओपेनहाइमरची भूमिका साकारणारे सिलियन मर्फी आणि एलिजाबेथ पुघ यांच्या असलेल्या एका इंटिमेट सीनमध्ये हिंदू घर्मात पवित्र समजली जाणारी भगवद् गीता दिसत असल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पण दुसरीकडे चित्रपटाच्या कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे.  'ओपेनहाइमर' नं कलेक्शनच्या बाबतीत भारतीय बॉक्स ऑफिसवर बार्बी या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. कारण हे चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच त्यांची एडवांस बुकिंग करण्यात आली होती. 

ट्रेड डेटा वेबसाइट सैकनिल्क अनुसार बार्बीनं रविवारी 18.58 कोटींची कमाई करणार असल्याची आशा व्यक्त केली होती. तर शुक्रवारी भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं फक्त 5 कोटी रुपयांची कमाई केली. 'ओपनहाइमर' विषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं 49.25 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसात जवळपास 17 कोटींची कमाई केली. तर उत्तर अमेरिकेत हे चित्र विपरीत असल्याचं पहायला मिळत आहे. वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये बार्बीनं 'ओपेनहाइमर' चित्रपटाला मागे टाकलं आहे. त्यातही बार्बी हा चित्रपट अनेक देशांमध्ये महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला आहे. तर 'ओपेनहाइमर' चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. 'ओपनहाइमर' चित्रपट हा हॉलिवूडमधील सगळ्यात जास्त ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. 

डेडलाइन अनुसार, 'बार्बी' नं रविवार पर्यंत जगभरात जवळपास 300 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. बार्बी आणि केन डॉलवर जवळपास 43 पेक्षा जास्त चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. हे चित्रपट फक्त इंग्रजी भाषेत प्रदर्शित होतात. तर 'ओपेनहाइमर' नं रविवार पर्यंत जगभरात 165.9 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. दरम्यान, भारतात हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता टॉम क्रुझच्या ब्लॉकबस्टर 'मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग - पार्ट वन' नं भारतात चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी या चित्रपटानं 98.35 कोटींची कमाई केली. 

हेही वाचा : इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीता दिसताच सिनेरसिकांना हादरा; Oppenheimer वर टीकेची झोड

दरम्यान, 'ओपेनहाइमर' या चित्रपटानं हॉलिवूडच्या फास्ट X या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडला आहे.  फास्ट X नं पहिल्या दिवशी 12.5 कोटींची कमाई केली होती. त्याआधी टॉम क्रूजच्या 'मिशन इम्पॉसिबल के पार्ट 7' नं पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई केली होती. मिशन इम्पॉसिबलनं पहिल्या दिवशी 12.3 कोटी रुपयांची कमाई केली होती.