मुंबई : १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याचा बॉलिवूडमधून संपात व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यानंतर फिल्मसिटीत पाकिस्तानी गायक आणि कलाकारांनाही बंदी घालण्यात आली आहे. तसेच नवज्योत सिंग सिंद्धूलाही फिल्मसिटीत बंदी घालण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ सिने एम्पलॉईजकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव चित्रनगरीतील चित्रिकरण बंद ठेवण्यात आले होते. सिनेकामगार संघटनेने याबाबत घोषणा केली होती. कलाकार, निर्माते आणि कामगारांनी एकत्रितपणे हल्ल्याचा निषेध केला होता. दुपारी २ ते ४ या वेळेत चित्रिकरण पूर्णपणे बंद ठेवून भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. त्यानंतर आता फेडरेशन ऑफ सिने एम्पलॉईजकडून पाकिस्तानी गायक, कलाकारांवर तसंच नवज्योत सिंग सिंद्धूंवरही फिल्मसिटीत बंदी घालण्यात आली आहे.
१४ फेब्रुवारी रोजी दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'कडून करण्यात आला. 'जैश ए मोहम्मद'चा सदस्य असणाऱ्या २२ वर्षिय आदिल दारने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला घडवून आणला. आरडीएक्ससारख्या स्फोटकांनी भरलेल्या कारची जवानांच्या बसला धडक देण्यात आली. या हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले.