"आरश्यात पाहिल्यावर वाटायचं...", बालिका वधू फेम अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव

तिच्या गोंडस आणि सहज अभिनयामुळे बालवयातच तिला प्रेक्षकांची वाहवा मिळाली होती.

Updated: Sep 11, 2022, 06:30 PM IST
"आरश्यात पाहिल्यावर वाटायचं...", बालिका वधू फेम अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव title=

Balika Vadh Avika Gor Transformation: बालिका वधू (Balika Vadhu) या मालिकेतून घरोघरी लोकप्रिय ठरलेल्या अविका गोरला आजही प्रेक्षक आनंदीच्याच नावानं ओळखतात. अविका गोरनं (Avika Gor) 2008 साली अभिनयाक्षेत्रात पदार्पण केले आणि अल्पावधीच तिची मालिका लोकप्रिय ठरली. तिनं अभिनय केलेली पहिलीच मालिका तूफान लोकप्रिय झाली. (balika vadhu actress avika gor used to cry after watching her in mirror now she is the most beautiful actress in television read what she says)

तिच्या गोंडस आणि सहज अभिनयामुळे बालवयातच तिला प्रेक्षकांची वाहवा मिळाली होती. परंतु मध्यंतरी तिला तिच्या वाढत्या वजनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अविकानं आपल्या या अडचणीबद्दल मोकळेपणाने उघडपणे सांगितले होते.  

सुरूवातीला आपल्या वाढत्या वजनामुळे अविकाच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली होती. ती स्वतःला आरश्यात पाहून रडायची. अविकानं सांगितले की ती तिच्या शरीरावर नाखूष होती. ती स्वतःचा तिरस्कारही करू लागली होती. तेव्हा अशावेळी वजन कमी करण्याचा निर्णय अविकानं घेतला. 

इन्टाग्रामवर एक ग्लॅमरस फोटो शेअर करताना अविका गौरनं तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल चाहत्यांसोबत शेअर करताना लिहिले की, मला ती रात्र अजूनही आठवते जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिल्यावर रडू लागायचे. मला स्वतःकडे पाहून आनंद व्हायचा नाही. शरीराचे वाढलेले वजन म्हणजे मोठे हात, पाय, पोट. तेव्हा आपण काहीतरी करायला हवे या भावनेनं अविकानं स्वतःवर काम करायला सुरूवात केली. तिची ही पोस्ट फार जुनी आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार अविका खूप खायची पण व्यायाम अजिबात करायची नाही. आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि मी मात्र त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही, असं म्हणत अविकानं सांगितले की तिला डान्सची फार आवड होती परंतु वाढलेल्या वजनामुळे मात्र मला डान्स करायची इच्छा व्हायची नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अशाप्रकारे तिनं आपला विचार बदलला आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करत तिने वजन कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. आणि असं केल्यानं तिला तिच्यात सकारात्मक फरक दिसू लागला व व तिनं 13 किलो वजन कमी केले.