Bachchan Pandey : 'बच्चन पांडे'मध्ये अक्षयचा अॅक्शनसह रोमान्स, पण कथानक तर असंय...

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार Akshay Kumar सध्या जैसलमेरमध्ये त्याच्या आगामी 'बच्चन पांडे' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त 

Updated: Mar 9, 2021, 06:28 PM IST
Bachchan Pandey : 'बच्चन पांडे'मध्ये अक्षयचा अॅक्शनसह रोमान्स, पण कथानक तर असंय... title=

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार Akshay Kumar सध्या जैसलमेरमध्ये त्याच्या आगामी 'बच्चन पांडे' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे, 'बच्चन पांडे'ची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत. 'बच्चन पांडे' सिनेमात अक्षय कुमारसोबत कृती सॅनॉन Kriti Sanon आणि जॅकलिन फर्नांडिज Jacqueline Fernandez स्क्रिन शेअर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी 'बच्चन पांडे'मधील अक्षयचा लूक रिलीज करण्यात आला होता, या लूकमध्ये तो मोठ्या दाढीमध्ये दिसला होता. या लूकवरुन या सिनेमात अक्षयच्या जबरदस्त अॅक्शनसीन पहायला मिळतील.

अॅक्शनसह सिनेमात रोमान्सही

'बच्चन पांडे' Bachchan Pandey या सिनेमात खिलाडीकुमार फक्त अ‍ॅक्शनसीन देणार नाही. तर या सिनेमात तो जॅकलीनसोबत रोमान्स करताना देखील दिसणार आहे. नुकतीच जॅकलिन फर्नांडिसनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या फोटोमध्ये जॅकलीन अक्षयच्या मिठीत असल्यांचं पहायला मिळतय.

या पोस्टनंतर बच्चन पांडे या सिनेमात अक्षय आणि जॅकलीनचा रोमान्स पहायला मिळणार असल्याचं समजतयं. हा फोटो शेअर करत जॅकलीननं म्हणतेय 'मी आज खूप उत्सुक आहे कारण अक्षय कुमारसोबत साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी 'बच्चन पांडे' सिनेमाचं शूटिंग सुरू झालयं. 

काय आहे कथानक

पुढच्या वर्षी आमच्या टीमला तुम्ही भेटायला तयार आहात ना? अशा आशायाचं कॅप्शन जॅकलीनने या फोटोला दिलं आहे. या सिनेमात बच्चन पांडेची पहिली प्रेयसीचा मृत्यू होतो. त्याच्यापासून त्याची प्रेयसी लांब जाते आणि या रागात सूडबुद्धीने तो गुंड बनतो. यानंतर बच्चन पांडे एका मुलीला भेटतो, जी एका प्रोजेक्टसाठी बच्चन पांडेच्या गावी आली असते, या मुलीची आणि बच्चन पांडेची चांगली मैत्री होते. 

यानंतर ही मुलगी बिघडलेल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि त्याला एक चांगली व्यक्ती बनवते. अक्षय या सिनेमात बच्चन पांडेची मूख्य भूमिका साकारणार आहे तर, जॅकलीन फर्नांडीस त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सेनॉन अक्षयला सुधरवणारी व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल. मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.