'सुपर डांसर' च्या सेटवर रामदेव बाबांनी गिफ्ट केली स्पर्धकाला गाय

' ओम शांती ओम' या सिंगिंग रिएलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लवकरच योगगुरू बाबा रामदेव एका डांस रिएलिटी शोमध्ये सहभागी होणार आहेत.  

Updated: Dec 16, 2017, 10:03 PM IST
'सुपर डांसर' च्या सेटवर रामदेव बाबांनी गिफ्ट केली स्पर्धकाला गाय  title=

 मुंबई: ' ओम शांती ओम' या सिंगिंग रिएलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लवकरच योगगुरू बाबा रामदेव एका डांस रिएलिटी शोमध्ये सहभागी होणार आहेत.  

लहान मुलांचा उत्साव वाढवणार 

'सुपर डांसर चैप्टर 2' या लहान मुलांच्या डान्स रिएलिटी शोमध्ये योगगुरू बाबा रामदेव सहभागी होणार आहेत. रामदेव बाबांचा सेन्स ऑफ ह्युमर फारच उत्तम आहे . त्यामुळे ते यापूर्वी  कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये सहभागी झाले होते.  

शिल्‍पा शेट्टी, कॉरियोग्राफर गीता आणि अनुराग बासु या जजससोबत रामदेवबाबा देखिल सहभागी होणार आहेत.  

विशालला गाय गिफ्ट केली 

रामदेव बाबांनी स्पर्धेतील 'विशाल ' नामक मुलाचा संघर्ष ऐकला. विशालच्या आई वडिलांनी त्याच्या भविष्यासाठी गाय विकून पैसे उभे केले होते.  विशालच्या आई बाबांचा त्याग आणि घराचे उत्पन्न अवलंबून असलेल्या गाईला विकल्यानंतर त्यांना पुन्हा आधार मिळावा म्हणून एक गाय गिफ्ट केली आहे.