फ्लोरिडाच्या बास्केटबॉल कोर्टवरही बाहुबलीची क्रेझ

  वर्षातील सुपर डुपर हिट फिल्म बाहुबली थिएटरमधून गेल्यास बराच काळ झाला. पण या फिल्मची जादू अजूनही सर्वांच्या मनावर आहे. अमेरिकेत याची प्रचिती आली असून एक बातमी आली आहे.

Updated: Dec 1, 2017, 10:13 AM IST
 फ्लोरिडाच्या बास्केटबॉल कोर्टवरही बाहुबलीची क्रेझ title=

मुंबई :  वर्षातील सुपर डुपर हिट फिल्म बाहुबली थिएटरमधून गेल्यास बराच काळ झाला. पण या फिल्मची जादू अजूनही सर्वांच्या मनावर आहे. अमेरिकेत याची प्रचिती आली असून एक बातमी आली आहे.

अमेरिका नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) च्या फेसबुक वॉलवर शेअर केलेल्या व्हिडिओ सर्वांच्या पसंतीस पडत आहे.

'क्रेजी देसी वाइब्स' 

 या व्हिडिओमध्ये तरुण-तरुणी बाहुबली गाण्यावर डान्स करत आहेत. एनबीएने या व्हिडिओसोबत 'क्रेजी देसी वाइब्स' असे कॅप्शनही लिहिली आहे. 

व्हिडिओ ट्विट

 या गृपमधील डान्सर्सनी भारतीय वेशाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांच्या डान्सने दर्शक प्रभावित झालेले दिसत आहेत.

७ लाखापेक्षा अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. 

बाहुबलीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरदेखील हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.

सातासमुद्रापार 

या डान्समध्ये जबरदस्त कोरिओग्राफी पाहायला मिळत आहे. टायमिंग, ताल यासोबतच नव्या स्टेप्सही त्यांनी केल्या आहेत. 

सातासमुद्रापारही बाहुबलीची क्रेझ असल्याचे हा व्हिडिओ पाहताना वाटत राहते.