मध्यरात्री कपडे काढून Ayushmann Khurrana ने शेअर केले असे फोटो म्हणाला, 'मला रात्री हे काम करायला आवडतं'

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी हटके भूमिका साकारत असतो. सध्या अभिनेता आयुष्मान खुराना,  'ड्रीम गर्ल 2' च्या शूटींमध्ये व्यस्त आहे. आयुष्मान खुरानाच्या आगामी सिनेमाबाबत प्रेक्षकांना अतिशय उत्सुकता आहे.

Updated: Mar 15, 2023, 07:59 PM IST
मध्यरात्री कपडे काढून Ayushmann Khurrana ने शेअर केले असे फोटो म्हणाला, 'मला रात्री हे काम करायला आवडतं' title=

मुंबई  : 'विक्की डोनर', 'बाला', 'आर्टिकल १५', 'ड्रिम गर्ल' सारख्या सिनेमात उत्कृष्ठ अभिनय करणारा आयुष्मान खुराना सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला आता कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. 

आपल्या अभिनयाने त्याने चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी छाप सोडली आहे. जेव्हा संपूर्ण जग शांत असतं, तेव्हा माझ्या मनाची धावपळ होते आणि मला स्वतःला वेग येतो. आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे, यासोबतच चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांसह नवीन अपडेट्स शेअर करत असतात.

सध्या अभिनेता आयुष्मान खुराना,  'ड्रीम गर्ल 2' च्या शूटींमध्ये व्यस्त आहे, त्याने शेअर केलं आहे की,  तो दिवसाच्या प्रत्येक तासात काम करण्याचा आनंद घेत आहे, तो एक सेलेनोफाइल आणि जागरण करणारी व्यक्ती आहे. अभिनेत्याने अलीकडेच सकाळी 3.40 वाजता त्याच्या शूटचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

याबद्दल बोलताना आयुष्मानने सांगितलं की, मी नाईट पर्सन आहे. मला रात्रीची शांतता नेहमीच सुखदायक वाटली आहे. जेव्हा मी रात्री सेटवर असतो तेव्हा मला सर्वात जास्त जिवंत वाटतं. टीममधील काही लोकांना नाईट शूट करणं अवघड जात असताना, मी सहसा सर्वांशी बोलत असतो, त्यांना प्रेरित करत असतो आणि रात्र एक्टिव्ह ठेवतो. मी रात्रीच्या शूटिंगचा आनंद घेतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्याने चंद्रावरील त्याच्या प्रेमाचा उल्लेख केला आणि सांगितलं की, रात्रीच्या शूटिंग दरम्यान ती सहसा सेटवर इकडे-तिकडे गप्पा मारतो, मला चंद्र खूप आवडतो, मी सेलेनोफाइल आहे आणि चंद्र मला खूप प्रेरणा देतो. सेटवर, मी सहसाच आजूबाजूला विश्रांती घेतो कारण मी त्या वातावरणाचा पूर्णपणे आनंद घेत असतो. अनेकदा मी माझी गाणी आणि कविता रात्री उशिरा लिहितो.

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या प्रत्येक चित्रपटातून काहीतरी हटके भूमिका साकारत असतो. एक्सपेरिमेंटल अभिनेता म्हणून आयुष्मान खुरानाला ओळखलं जातं. आयुष्मान खुरानाच्या आगामी सिनेमाबाबत प्रेक्षकांना अतिशय उत्सुकता आहे.