Diwali 2022: Ayushmann Khurrana कडे दिवाळीपूर्वीच रंगली पार्टी, पत्नी ताहिराने Video केला शेअर

Bollywood Diwali Party 2022: मुंबईत (Mumbai) रविवारी आयुष्मान खुराना आणि पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांनी बॉलिवूड (Bollywood) कलाकारांसाठी दिवाळी पार्टीचं (Diwali Party 2022) आयोजन केलं होतं. ताहिराने या पार्टीचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. 

Updated: Oct 18, 2022, 09:52 AM IST
Diwali 2022: Ayushmann Khurrana कडे दिवाळीपूर्वीच रंगली पार्टी, पत्नी ताहिराने Video केला शेअर  title=
ayushmann khurrana diwali party 2022 Video nmp

Ayushmann Khurrana And Tahira Kashyap's Diwali Party Video: दिवाळी (Diwali 2022) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळीकडे बाजारपेठा सजल्या आहेत. अशातच बॉलिवूड स्टारदेखील दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) कॉमेडी-ड्रामा 'डॉक्टर जी' (Doctor G) प्रदर्शित झाल्यानंतर वीकेंडमध्ये 15 कोटींचा गल्ला जमा केला आहे. या यशासोबत आयुष्मान खुरानाने दिवाळीपूर्वीच दिवाळी धमाका केला आहे. मुंबईत (Mumbai) रविवारी आयुष्मान खुराना आणि पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांनी बॉलिवूड (Bollywood) कलाकारांसाठी दिवाळी पार्टीचं (Diwali Party 2022) आयोजन केलं होतं. ताहिराने या पार्टीचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. 

'जादुई' क्षणांचा व्हिडिओ 

या व्हिडीओमध्ये आयुष्मान आणि ताहिराचं आलिशान घर दिवाळीसाठी सजलं आहे. पुढे तुम्ही पाहू शकता आयुष्मान आणि ताहिरा डान्स करताना दिसतं आहेत. व्हिडिओमध्ये फेयरी लाइट्स, डान्सिंग पाहुणे, करण जोहर (Karan Johar)आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) सारख्या सेलेब्सने पोकर खेळताना सुंदर सजावटीची झलक दिली आहे. क्रिती सॅनन (Kriti Sanon), वरुण धवन (Varun Dhawan), सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. (ayushmann khurrana diwali party 2022 Video nmp)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap)

Diwali vibes!

ताहिराने शेअर केलेल्या इंस्टाग्राम (Instagram) रीलमध्ये क्रिती वरुणसोबत डान्स करताना दिसत आहे. तर आयुष्मान खुरानाने काळा कुर्ता पायजामा घातला होता आणि ताहिराने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. ताहिराने मनीष, सोनाली आणि नुसरत भरुच्चाचा एक सेल्फीही पोस्ट केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TANUJJ GARG (@tanuj.garg)

ये तेरा घर ये मेरा घर!

ताहिराने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओला खूप सुंदर कॅप्शन दिलं आहे. ती लिहते की, 'घरं हे नुसतं काही नसतं, तर लोकांमुळे ते घर बनतं! काल रात्री प्रत्येकाने आश्चर्यकारक ऊर्जा निर्माण केली. आम्हाला सर्वांना एकमेकांविषयीची आपलुकी आणि प्रेम ही जादुई होती. प्रत्येकाने आपल्या आवडत्या आणि प्रियजनांसोबत दिवाळी साजरी करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि ते साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभले. सर्वांना प्रेम आणि आनंद.'