Avinash Narkar : सेलिब्रेटीच्या फिटनेसची अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे अविनाश नारकर यांची. त्यांनी आणि ऐश्वर्या नारकर यांनी काही दिवसांपुर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर अविनाश नारकरांना आजोबा म्हणत ट्रोल केले होते. त्यावरून ऐश्वर्या नारकरांनीही त्या नेटकऱ्यांची चांगलीच घेतली होती. त्यांच्या या व्हिडीओवरून त्यांना नानाविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. त्यांना त्यांच्या वयावरून फारच ट्रोल करण्यात आले होते. आता मात्र ट्रोलर्सना अविनाश नारकरांनी चांगलेच सुनावले आहे. यावेळी अविनाश नारकरांनी असा वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे की काही विचारून नका. यावेळी त्यांनी आजोबा म्हणणाऱ्यांना बरोबर दाखवून दिले आहे. तेव्हा चला तर मग पाहुया अविनाश नारकरांचा हा ढासू वर्कआऊट व्हिडीओ.
अनेकदा कलाकारांना त्यांच्या वजनावरून आणि रूपावरून खूप ट्रोल केले जाते. त्यांच्या कुठल्याही सोशल मीडियावरील पोस्टवरूनही त्यांना फार ट्रोल केले जाते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अविनाश नारकरांची. 57 वयातील त्यांचा फिटनेस पाहून सगळेच अवाक झाले आहेत. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांनी त्यांचा डंबेल्स घेत शेअर केलेला व्हिडीओ हा तूफान व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहे. सध्या अशाच एका व्हिडीओमुळे आता अविनाश नारकारांचे नेटकरी चांगलेच कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्यातून यावेळी सर्वाधिक तरूणांनीच हा व्हिडीओ पाहिला असेल. यावेळी त्यांच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर या अनेकदा आपले हटके व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अविनाश नारकरांच्या या व्हिडीओची. मध्यंतरी त्या दोघांनी त्यांचा असेच एक फीटनेस व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होती.
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी अनेकदा विविध मालिका आणि चित्रपटांतून एकत्र काम केलं आहे. सध्या त्यांच्या एका व्हिडीओची जोरात चर्चा आहे. अनेकदा त्यांना ट्रोल केले जाते आणि त्यावरून ऐश्वर्या नारकर वेळोवेळी उत्तर देतानी दिसतात.