अतुल कुलकर्णीचं मोजक्या शब्दात विक्रम गोखलेंवर निशाणा

विक्रम गोखलेंचा कंगनाला पाठिंबा 

Updated: Nov 18, 2021, 11:44 AM IST
अतुल कुलकर्णीचं मोजक्या शब्दात विक्रम गोखलेंवर निशाणा title=

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना रानौतने '1947चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले' हे वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचा अपमान केला. यानंतर खूप मोठा गदारोळ झाला. 

अशावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याशी सहमत असल्याचं म्हटलं. यानंतर अनेकांनी गोखले यांच्यावर निशाणा साधला. अभिनेता अतुल कुलकर्णीने देखील विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे. 

विक्रम गोखले यांनी पुण्यात एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत असताना कंगनाच्या मताशी सहमत असल्याचं म्हणत विधानाचा पुनरुच्चार केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यावर अभिनेता अतुल कुलकर्णी यानं अप्रत्यक्षपणे विक्रम गोखले यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

ज्येष्ठता आणि शहाणपण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, अशा मोजक्या शब्दांत त्यानं गोखले यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी अभिनेते विक्रम गोखलेचं नाव घेतलेलं नाही. 

अनिता बोस यांचं कंगनाला सडेतोड उत्तर 

अनिता बोस यांनी वडील नेताजी सुभाष चंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यातील संबंधांवर त्यांचे मत मांडले आहे. अनिता यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेताजी आणि महात्मा गांधी यांच्यात गुंतागुंतीचे नाते होते. त्यांच्या मते, गांधीजींना वाटले की ते नेताजींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

अनिता बोस यांनी कंगनाला फटकारलं

गेल्या आठवड्यात अभिनेत्री कंगना रानौत म्हणाली की, महात्मा गांधींनी सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला नाही. गांधीजी नेताजींना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यास तयार आहेत. या संवादात जर्मनीत राहणाऱ्या अनिता बोस यांनी मोठा खुलासा केला आहे.