रणरागिणी किचनमध्ये, सुगरणी झाल्या.. 'तिखट तडका' दिला की लागला 'ठसका'?

चित्रा वाघ, रुपाली पाटील, किशोरी पेडणेकर नुकत्याच एका किचनमध्ये एकत्र दिसल्या. 

Updated: Apr 4, 2022, 06:11 PM IST
रणरागिणी किचनमध्ये, सुगरणी झाल्या.. 'तिखट तडका' दिला की लागला 'ठसका'? title=

मुंबई : चित्रा वाघ, रुपाली पाटील, किशोरी पेडणेकर नुकत्याच एका किचनमध्ये एकत्र दिसल्या. राजकारणातल्या या रणरागिणी 'किचन'मध्ये आमने सामने आल्या. यावेळी या तिन्ही महिला राजकीय नेत्यांनी बरेच खुलासे केले. यावेळी बरेच किस्से, धमाल, मस्ती या नेत्यामंडळींसोबत पहायला मिळाली. 

आता तुम्ही म्हणाल की हा सगळा नेमका काय प्रकार आहे. तर आम्ही तुमचं हे कन्फूजन दूर करणार आहोत. हे सगळ घडलं आहे. झी मराठी वाहिनीवरील 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात.  झी मराठी वाहिनीवरील 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाने अवघ्या काही वेळातच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला नवं-नवीन पाहूणे येत असतात. आणि आपल्या किचन संबधित किस्से सांगतात.

 या कार्यक्रमाच्या सुरुवातीला किशोरी ताई, रुपाली ताई, चित्रा वाघ त्यांच्या एंट्रीनेच धुमाकूळ घातला. यावेळी कार्यक्रमाचा होस्ट संकर्षण कऱ्हाडे मंचावर किशोरीताई यांना आमंत्रित करतो. यानंतर संकर्षण महाराजांना म्हणतो की, 'त्यांचं असं म्हणणं आहे की, आपली बाल्कनी अनाधिकृत आहे. ती पाडण्याचे त्यांचे आदेश आहेत.' यानंतर महाराज महापौर किशोरी ताईंचा विजय असो. असे नारे लावू लागतात. त्यानंतर किशोरी ताई भडकतात आणि म्हणतात, ''अजिबात चालणार नाही.  हे बांधकाम नियम बाह्य दिसतयं. ही बाल्कनी नियम बाह्य दिसतेयं. कुठलंही बांधकाम नियमबाह्य खपवून घेतलं जाणार नाही.'' 

संकर्षण यानंतर चित्राताई वाघ यांना मंचावर आमंत्रित करतो. मंचावर येताच महाराजांना चित्राताई म्हणतात, तुमच्या बायकोची तक्रार आहे की, तुम्ही त्यांना बाहेर घेवून जात नाही. यानंतर रुपालीताई पाटील या मंचावर शेठच्या कॉलरला पकडून एंट्री घेतात. आणि म्हणतात, ''अहो तुमचे हे शेठ कठोर शिक्षा देतात अशी तक्रार आली आहे. त्यामुळे तुमच्या शेठला सुट्टी नाही.'' अशाप्रकारे या मंचावर या तिन्ही महिला राजकीय नेत्यांची धमाल एंट्री होते. त्यामुळे या रणरागिणी किचनमध्ये, सुगरणी झाल्या.. याचबरोबर त्यांनी 'तिखट तडका' दिला की लागला 'ठसका' ही सगळी धमाल आपल्याला लवकरच  झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात पाहायला मिळेल. .