मुंबई : बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत, रश्मी देसाई, देवोलीना आणि अभिजीत बिचुकले यांच्या आगमनाने, शो पूर्वीपेक्षा अधिक मनोरंजक वाटू लागला. वाइल्ड कार्डद्वारे ज्या स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे, ते प्रेक्षकांचं मनोरंजन करतील अशी आशा होती. पण याठिकाणी वेगळ चित्र दिसत आहे. वाइल्ड कार्ड म्हणून आलेल्या अभिजीत बिचुकलेमुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे जगणं कठीण झालं आहे.
बिचकूलेच्या वागणुकीमुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्रास होत आहे. त्याने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अभिजीतने देवोलीनाकडे Kiss मागितल्याने कुटुंबातील सर्व सदस्य त्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे घरात एकट्या असलेल्या अभिजीतने विष खाण्याची इच्छा व्यक्त केली.
अभिजीत बिचुकले निशांतकडे जातो आणि वॉशरूममध्ये रंग आहे का? असं विचारतो. कारण त्याला ते खायचे आहे. गेले दोन दिवस घरात जे काही चालू आहे. ते पाहून त्याला कंटाळला आहे. बिचुकलेचे बोलणे ऐकून निशांत भट्टला धक्काच बसला.
निशांतने सर्व घडला प्रकार शमिता आणि रश्मीलाही सांगितला. बिचुकलेचे म्हणणे ऐकून प्रतिक त्याच्याकडे जातो आणि समजावण्याचा प्रयत्न करतो. टिकट टू फिलाने टास्क दरम्यान, अभिजीत बिचुकलेने देवोलीनाला मदतीच्या बदल्यात किसची मागणी केली होती. देवोलीनाने हा मुद्दा सर्वांसमोर ठेवला, त्यानंतर बिग बॉसच्या घरातील बहुतेक लोक बिचुकलेच्या विरोधात उभे राहिलेले दिसून आले.