'हाय रेटेड' बॉलिवूड गायकावर परदेशात हल्ला

अज्ञात व्यक्तीकडून हल्ला...

Updated: Jul 30, 2019, 12:42 PM IST
'हाय रेटेड' बॉलिवूड गायकावर परदेशात हल्ला  title=

मुंबई : तरूणांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायक गुरू रंधावावर कॅनडा येथील वेंकुवर येथे एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. आता त्याची परिस्थिती स्थिर असल्याचे कळत आहे. या गोष्टीची माहिती खुद्द गुरूचा जवळचा मित्र आणि पंजाबी गायक प्रीत हरपालने फेसबूकच्या माध्यमातून दिली आहे. फेसबूकवर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. 'गुरू हा खूप चांगला व्यक्ती आहे. मी गुरूला खूप आधी पासून ओळखतो. तो नेहमी इतर लोकांचा आदर करतो.' अशी भावूक पोस्ट प्रीत हरपालने लिहिली आहे. 

जेव्हा गुरूवर हल्ला झाला तेव्हा प्रीत हरपाल देखील त्याच्या सोबत होता. मीडिया रिपोर्टनुसार, गुरू रंधावा शो संपल्यानंतर आपल्या गाडीकडे जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर वजनदार गोष्टीने एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. सध्या त्याची परिस्थिती स्थिर असल्याचे समोर येत आहे. 

गुरू रंधावाने आतापर्यंत अनेक गाण्यांच्या माध्यमातून रसीकांच्या मनात घर निर्माण केले आहे. हिंदी त्याचप्रमाणे अनेक पंजाबी गाणी त्याच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. 'पटोला', 'दारू वरगी', 'हाय रेटेड गबरू' अशा अनेक गाण्यांच्या माध्यमातून तो प्रकाशझोतात आला आहे. गुरूवर हल्ला झाल्यानंतर बॉलिवूडकरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.