VIDEO : Athiya Shetty-KL Rahul यांचा हनिमूनबद्दल मोठा निर्णय...

Athiya Shetty-KL Rahul Honeymoon Plan : क्रिकेटर KL Rahul आणि अभिनेत्री Athiya Shetty अखेर विवाहबंधनात अडकले. नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रीण यांचा साक्षीने त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली. पण या दोघांनी हनिमूनबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. 

Updated: Jan 24, 2023, 10:57 AM IST
VIDEO : Athiya Shetty-KL Rahul यांचा हनिमूनबद्दल मोठा निर्णय... title=
athiya shetty kl rahul Wedding video cancel honeymoon plan andGrand reception party after the IPL match marathi news

Athiya Shetty-KL Rahul Wedding : टीम इंडियाचा क्रिकेटर के एल राहुल (KL Rahul) आणि अभिनेता सुनिल शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) हे अखेर लग्न बेडीत अडकले. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. पण या दोघांनी लग्नानंतर हनिमूनबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर चाहत्यांना आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

म्हणून त्यांनी हनिमूनला...

केएल राहुलने हनिमूनपेक्षा क्रिकेटला प्राधान्य दिलं आहे. आगामी क्रिकेट स्पर्धेसाठी या नवविवाहित जोडप्याने हनीमूनला जाणं रद्द केलं आहे. याशिवाय लग्नानंतर राहुल आणि अथिया नवीन बिझनेस सुरु करणार आहेत. त्यासाठी हे दोघे हनीमूनला जाणार नाही आहेत. दरम्यान केएल राहुलने लग्नासाठी श्रीलंकेविरुद्ध मालिका सोडली होती. पण आता तो लग्नानंतर पुन्हा सराव सुरु करणार आहे. या दोघांनी कामाला प्राधान्य देऊन आपला हनिमून प्लॅन काही काळासाठी पुढे ढकलला आहे. (athiya shetty kl rahul  Wedding video cancel honeymoon plan andGrand reception party after the IPL match marathi news)

हनीमून रद्द तर रिसेप्शन पार्टीचं काय?

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचे लग्न सोमवारी सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्यावर जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाले. अथिया-राहुलच्या लग्नानंतर चाहते आता त्यांच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीची वाट पाहत आहेत. या सोहळ्याला क्रिकेटर्स आणि बॉलीवूडमधील कलाकारांची मांदियाळी पाहिला मिळणार यात काही शंका नाही. आता आम्ही तुम्हाला सांगतो सासेबुवा सुनील शेट्टीने रिसेप्शन पार्टीबद्दल गुप्त उघड केलं आहे. ते म्हणाले की, आयपीएल स्पर्धेनंतरच ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी होणार आहे.