लग्नानंतर आलियाची पहिलीवहिली इच्छा पूर्ण करण्यासाठी रणबीरचा मोठा निर्णय

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज सप्तपदी घेणार आहेत.

Updated: Apr 14, 2022, 03:27 PM IST
लग्नानंतर आलियाची पहिलीवहिली इच्छा पूर्ण करण्यासाठी रणबीरचा मोठा निर्णय title=

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 14 एप्रिल म्हणजेच आज सप्तपदी घेणार आहेत. लग्नांच्या विधींना सुरूवात झाली आहे. मेहंदीच्या फंक्शननंतर, रणबीरची आई नीतू कपूर यांनी पुष्टी केली आहे की 14 एप्रिल रोजी दोघंही वास्तूमध्ये सात फेरे घेणार आहेत. यासोबतच हळदीचा विधीही पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. अशा परिस्थितीत दोन्ही कपलची एक झलक पाहण्यासाठी सोशल मीडियावर चाहते आतुर आहेत.

मात्र हे सगळं पाहता असं वाटत नाही की, त्यांचा एकही फोटो व्हायरल होईल. दरम्यान, रणबीरच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रणबीर कपूरने सोशल मीडियापासून स्वत:ला दूर ठेवलं आहे पण त्याची भावी पत्नी आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

ती अनेकदा रणबीरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वृत्तांनुसार, रणबीर कपूर लवकरच सोशल मीडियावर पाऊल ठेवणार आहे.लग्नाच्या बातम्यांदरम्यान, रणबीर कपूर लवकरच सोशल मीडियावर डेब्यू करून आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. हे सरप्राईज एक खास व्हिडिओ संदेश असेल, जो अभिनेता त्याच्या चाहत्यांना देणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची भावी पत्नी आलियाने त्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी राजी केलं आहे. रणबीर कपूर हा असा एक बॉलिवूड स्टार आहे जो अनेक वर्षांपासून सोशल मीडियापासून दूर आहे. अशा परिस्थितीत त्याचं सोशल मीडियावर पाऊल ठेवणं चाहत्यांसाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नसेल.