शाहरूख खानच्या मुलाचा 'हा' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान हा अगदी त्याच्यासारखा हुबेहुब दिसतो.

Updated: Sep 7, 2017, 10:29 AM IST
शाहरूख खानच्या मुलाचा 'हा' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल  title=

मुंबई : शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान हा अगदी त्याच्यासारखा हुबेहुब दिसतो.

आर्यनचे अजून सिनेसृष्टीत पदार्पण झाले नसले तरीही त्याची फॅन फॉलोविंग बरीच आहे. काही दिवसांपूर्वीच आर्यनचा कोणता फोटो सोशल मीडियावर अपलोड करावा याबद्द्ल तो फार सजग असल्याची एक पोस्ट गौरी खानने अपलोड केली होती. त्यानुसार आर्यन काही विशिष्टच फोटो सोशल मीडियामध्ये अपलोड करतो. 

 

Game day 

A post shared by Aryan Khan (@___aryan___) on

 

नुकताच आर्यनने इंस्टाग्रामवर ' गेम डे' असे कॅप्शन देत एक खास फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये आर्यनचे सिक्स पॅक अ‍ॅब्सदेखील स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे आर्यन त्याच्या फीटनेसकडेही विशेष लक्ष देत असल्याचे समजते. आर्यनच्या या 'गेम डे' पोस्टची सोशल मीडियामध्ये फार चर्चा आहे. अनेकांनी आर्यनच्या या फोटोला 'लाईक' बटण ठोकत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

शाहरूख खानची 'कार्बन कॉपी' समजला जाणारा आर्यन सिनेसृष्टीत येणार का ? कोणत्या चित्रपटातून आणि कोणासोबत आर्यन डेब्यू करणार याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.