आत्तापर्यंत 'या' मुलींसोबत जोडलं गेलंय Aryan Khan चं नावं? पाहा संपुर्ण लिस्ट!

Aryan Khan Dated: नोरा फेतहीचं नाही तर आर्यन खानचं नावं अनेक मुलींसोबत जोडलं गेलं आहे. त्यामुळे आर्यन खानच्या डेटिंगची कायमच चर्चा होत राहते. 

Updated: Jan 4, 2023, 09:44 PM IST
आत्तापर्यंत 'या' मुलींसोबत जोडलं गेलंय Aryan Khan चं नावं? पाहा संपुर्ण लिस्ट! title=
aryan khan

Aryan Khan Dated: आर्यन खानचं नावं दोन वर्षांपुर्वी ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं. त्यामुळे सगळीकडेच आर्यन खानची चर्चा (Aryan Khan) होती. ड्रग्ज केसमुळे तो पुरता अडकला होता. परंतु ही कॉन्ट्रोव्हर्सी होण्याआधीही आर्यन खानचं (Aryan Khan Controversy) नावंही काही मुलींबरोबर जोडलं गेलं आहे. सध्या आर्यन खानचं नावं हे नोरा फतेहीसोबत जोडलं जात आहे. परंतु नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) आधीही आर्यन खान काही मुलींना डेट करत होता. आर्यन खानच्या ड्रग्ज कॉन्ट्रोव्हर्सीमुळे (Drugs Controversy) मात्र आर्यनच्या करिअरवर गदा येणार का अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यातून ड्रग्ज केस झाल्यानंतरही आर्यन खानचा पार्टी सिलसिलाही चालू राहिला. या केसनंतर तो एका पार्टीमध्येही स्पॉट झाला होता. त्यासोबत या केसमधून बाहेर पडल्यानंतर मात्र आर्यन सार्वजनिक ठिकाणीही दिसला होता. सध्या आर्यन खान वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. (Aryan Khan dating aryan khan rumoured on dating these girls know more)

अमिताभ बच्चन यांच्या नातीशी जोडलं होतं नाव?

मध्यंतरी चार वर्षांपुर्वी आर्यन खान अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नंदा नवेली हिला शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यांचे हे रॉमेण्टिक फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल झाल्याच्याही चर्चा होत्या, अनेकदा ते एकत्र स्पॉट झाल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Granddaughter) यांना अनेकदा यावर प्रश्नही विचारण्यात आले होते. परंतु याबद्दल कोणीही काहीच वाच्यता केली नव्हती.

परंतु त्यानंतर या बातम्या इतक्या व्हायरल होऊ लागल्या होत्या की यांवर खुद्द नव्यानंच खुलासा केला होता. ती म्हणाली की, मी आणि आर्यन खूप चांगले मित्र आहोत आमच्या असं कोणतंच नातं नाही. त्याचसोबत जे काही फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल झाले होते ते खोटे असल्याचेही स्पष्ट झाले. यावर त्यांच्या कुटुंबियांनीही खुलासा केला होता की आर्यन आणि नव्या (Navya Nanda) हे चांगले मित्र असून ते काही कोणाला डेट करत नाहीत. 

त्या फॉरन मुलीसोबत फोटो झाले होते व्हायरल? 

आर्यनची बहीण सुहाना खान हिनं इन्टाग्रामवर आर्यनचा आणि एका परदेशी मुलीचा फोटो पोस्ट केला होता असे कळते, ज्यात त्या दोघांचेही खूपच कॉझी फोटोज आहेत. त्यामुळे ही आर्यन खानची नवीन गर्लफ्रेंड आहे की काय अशा चर्चांना उधाण आले होते परंतु ती त्याची गर्लफ्रेंड आहे हे अद्यापही स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे त्यानंतर यावर फारशी चर्चा झाली नाही. 

परंतु हा फोटो सगळीकडेच खूप जास्त व्हायरल झाला होता. आता आर्यन खानचं नावं नोरा फतेहीशी जोडलं गेलं आहे.